islampur Police have taken a strong stand on spreading abuses 
कोल्हापूर

युवा नेत्यालाच घेतलं ताब्यात ; मग काय सगळा सोशल मीडियाच पडला गप गार... 

धर्मवीर पाटील

इस्लामपूर (सांगली) - सोशल मीडियावर अफवा पसरवून नियमभंग करणाऱ्या लोकांवर कारवाई होणार हे आपण नेहमी ऐकत, वाचत असतो; पण पुढे फार काही झाल्याचे ऐकीवात येत नसते. पण सध्या सोशल मीडियावर 'हॉट' बनलेल्या 'कोरोना'मुळे कायदे काय असतात आणि त्याची अंमलबजावणी कशी असते हेदेखील नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. त्या अनुषंगाने इस्लामपुरात असाच एक किस्सा घडला आणि सोशल मीडियावरची गर्दी देखील झपाट्याने कमी झाली.

घडले असे, सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने मेसेज व्हायरल होत आहेत. सध्या राज्यभर कलम १४४ लागू आहे. दरम्यान एक एप्रिल आल्याने या दिवशी 'एप्रिल फूल'च्या नावाखाली खोटे मेसेजही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. त्यामुळे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे की या काळात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे मेसेज करू नयेत. पण दरवेळेस येणारा अनुभव विचारात घेता यावेळीही काहींनी या सुचनेकडे दुर्लक्ष केले असावे. पण मंगळवारी (ता.३१) रात्री इस्लामपूर पोलिसांनी एका युवा नेत्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हे दाखल केले. बहुदा सांगली जिल्ह्यातील अशी ही पहिलीच कारवाई होती. या नेत्याने असेच कोरोना आणि राजकीय हालचाल या अनुषंगाने एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला होता, त्यासाठी पोलिसांनी त्याला फक्त ताब्यातच घेतला नाही तर गुन्हे दाखल करून न्यायालयातदेखील हजर केले आणि शिक्षा होईल यासाठी प्रयत्न केले. दरम्यान कारवाईचा हा मेसेजदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि बऱ्याच व्हाॅट्स अॅप ग्रुपच्या admin लोकांनी आपापल्या ग्रुपचे सेटिंग बदलून टाकले. या सेटिंगनुसार फक्त Admin हाच आपल्या ग्रुपमध्ये मेसेज पोस्ट करू शकतो. त्यामुळे या कारवाईचा परिणाम असा झाला की, एप्रिलफुल असल्याने जी काही गर्दी सोशल मीडियावर होते, ती बऱ्याच अंशी घटली आणि अनेकांचा संभाव्य त्रास कमी झाला. 

इस्लामपूर शहर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत संवेदनशील बनलेले असताना संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिसांनी जी काही भूमिका घेतली आहे, ती खरेच कौतुकास्पद आहे. कायद्याचा धाक किंवा बडगा काय असतो हे या परिस्थितीत लोकांना अनुभवायला मिळत आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काही बाबी करायला कोणत्याच यंत्रणेचा आक्षेप नसतो, पण जेव्हा परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाते तेव्हा मात्र प्रत्येकाने जपूनच वागले पाहिजे, असा अनुभव देणारा हा काळ आहे, याचा प्रत्यय लोक घेत आहेत.

"सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य प्रत्येकाने लक्षात घ्यावे. गैरप्रकार आढळल्यास कोणताही मुलाहिजा न बाळगता पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल."
नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक, इस्लामपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाचा फटका मुंबईकरांना! 15-20 मिनिटे उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे स्टेशनवर प्रचंड गर्दी; प्रवाशांची तारांबळ

Amit Satam Video : मुंबईतील दुर्घटनांचे भाजप शहराध्यक्षांना गांभीर्यच नाही? अमित साटम यांचा हसतानाचा व्हिडिओ व्हायरल, विरोधक आक्रमक

Aaron Summers Child Abuse Charges : फेसबूकवरून ओळख, १५ वर्षीय शाळकरी मुलीला कारमध्ये बसवून नको नको ते कृत्य... ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूवरील आरोप सिद्ध

Latest Marathi News Live Update : चार दिवसांच्या मुसळधार पावसाने पाच बंधारे पाण्याखाली, राजाराम बंधाऱ्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास

Koyna Dam Update : कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोयना धरणात 5 हजार क्युसेकहून अधिक पाण्याची आवक; जिवंत पाणीसाठा 'इतक्या' टीएमसीवर..

SCROLL FOR NEXT