It rained, the test pool filled up again ... 
कोल्हापूर

पाऊस आला, परीख पूल भरला... 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकामागील बाबुभाई परिख पुलाचे दुखणे संपायला तयार नाहीत. बुधवारी झालेल्या मध्यम पावसातही हा पूल पाण्याने पूर्ण भरुन गेल्याने लोकांची अडचण झाली.

नाल्याचे गटर झाल्यानेच ही समस्या पुन्हा नव्याने डोके वर काढत आहे. बाबुभाई परिख पुलाचे दुखणे संपविणे, हे मोठे आव्हान झाले आहे. नेहमीचे येतो पावसाळाही आणि परिख पुलाची दुखणेही असे म्हणण्याची वेळ आहे. 

कोल्हापूर शहराला उत्तर-दक्षिण जोडण्यासाठी जे प्रमुख दोन चार मार्ग आहेत. त्यात बाबुभाई परिख पूल महत्वाचा मार्ग आहे. टेंबलाई उड्डाण पुलाचे काम सुरु असल्याच्या काळात परिख पुलाला किती महत्व होते, हे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे या पुलाला शहराच्या दृष्टीने अन्यन्य साधारण महत्व आहे. पण काही वर्षात या पुलाच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनेक प्रकारची दुखणी या पुलाला आहेत. पावसाळ्यात पुलाच्या स्लॅबमधून खाली गळणारे पाणी, ही जशी डोकेदुखी आहे. त्याचपद्धतीने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहिल्याने पावसाळ्यात या पुलाखालून जाणे जोखमीचे ठरते आहे. मुळातच कावळा नाका हा उंचावरचा भाग, तेथून शिवाजी पार्क, दाभोळकर कॉर्नरपासून ते मध्यवर्ती बसस्थानकातील सर्व पाणी दक्षिणेच्या बाजुने परिख पूलामध्येच एकत्र होते आणि तेथून एका बोळातून हे पाणी साईक्‍स एक्‍सटेंशनमध्ये येते आणि तेथून हे पाणी शहाजी लॉ कॉलेजचा चौकापासून ते जयप्रकाश नारायण उद्यानाजवळील मोठ्या नाल्याला येवून मिळते. परिख पुलातून ते जयप्रकाश नारायण उद्यानापर्यंत पावसाळ्यातील या पाण्याचा हा प्रवास आहे. 

यंदाच्या वर्षी मात्र पहिल्याच पावसातही या पुलात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. याचे कारण परिख पुलाखालून ते साईक्‍स एक्‍सटेंशनच्या दिशेने जाणाऱ्या चॅनेललगत महापालिकेने सुमारे सहा लाख रुपये खर्च करुन या चॅनेलला भिंत उभी केली आहे. या भिंतीमुळे पाण्याचा निचरा होणारा मार्गाची रुदीं कमी झाली आहे. नाल्याचे गटर झाल्याने ही समस्या भेडसावते.

बाबुभाई परिख पुलाच्या संदर्भात कोणतीही समस्या निर्माण झाली की, उपमहापौर संजय मोहिते हे या कामात नेहमीच पुढाकार घेतात. आजही सकाळपासून ते या मोहीमेत सहभागी होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शहर अभिंयता सरनोबत यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी यांना बोलावून त्यांनी परिस्थिती दाखविली. 

बाबुभाई परिख पुलातील पाणी बाहेर काढण्यासाठीची तांत्रिक अडचण निर्माण झाली असली तरी या पाण्याच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर केले जातील. कितीही निधी लागला तरी हा प्रश्‍न निकालात काढू. 
- संजय मोहिते, उपमहापौर. 

 

दृष्टिक्षेप 
- शहरातील चार प्रमुख मार्गापैकी एक परिख पूल 
- पुलाखाली पाणी साचल्यास ये-जा करणे जोखमीचे ठरते 
- नाल्याचे गटर झाल्याने उद्‌भवली समस्या 
- भिंतीमुळे पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गाची रुंदी कमी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

Maharashtra Rain Forecast : राज्यात पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसांसाठी मोठे भाकीत; कोकण, मध्य महाराष्ट्रसह घाटमाथ्यावर बरसणार पाऊस

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

Latest Marathi News Live Update: शेतातील सुपीक मातीची चोरी, तक्रार दाखल

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT