It was time for the Corona Control Committee to be quarantined in ichalkaranji 
कोल्हापूर

आता हद्द झाली ; कोरोना नियंत्रण समितीवरच आली क्वारंटाईन होण्याची वेळ

संजय खूळ

इचलकरंजी : शहरात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेल्या समितीलाच आता होमक्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत उपस्थित असलेल्या एका लोकप्रतिनिधीला कोरोना संसर्ग झाला आहे. या बैठकीस उपस्थित असलेल्या पोलीस उपअधिक्षक, मुख्याधिकारी, नगराध्यक्षा यांच्यासह सर्वांनाच  होमक्वारंटाईन करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. यामुळे शहरात खळबळ माजली आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत होता. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी तीन दिवसापूर्वी येथील जलतरण तलावात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलीस उपअधीक्षक मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह नगरसेवक तसेच काही अधिकारी उपस्थित होते. यातील एका नगरसेवकास आज कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वांनाच आता होमक्वारंटाईन करावे असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

दरम्यान, या नगरसेवकांच्या तीव्र संपर्कात आलेल्या अधिकारी आणि पदाधिकारी यांना तातडीने रुग्णालयात पाचारण करण्यात आले आहे. शहरावर नियंत्रण ठेवणाऱ्या कोरोना नियंत्रण समितीवरच आता होमक्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ माजली आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT