Jaggery Price esakal
कोल्हापूर

Jaggery Price : गुळाची आवक निम्म्याने घटली; महिन्याभरात गुळाचे भाव 200 ते 300 रुपयांनी वाढण्याची शक्यता

यंदाच्या गूळ हंगामासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उत्पादन घेण्याला मर्यादा आल्या.

शिवाजी यादव

यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत दोनशे ते रुपयांनी भाव वाढला आहे. पण, मोजकाच गूळ बाजारात येत आहे.

कोल्हापूर : यंदाच्या गूळ हंगामासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उत्पादन घेण्याला मर्यादा आल्या. त्यामुळे बाजारपेठेतील गुळाच्या आवकेत निम्म्याने घट झाली. चांगल्या गुळाची आवक वाढल्यास महिन्याभरात गुळाचे भाव आणखी दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

गूळ हंगामासाठी बीड, धाराशीव, लातूर, बार्शी, मंगळवेढा भागातून गुळकरी कामगार येथील गुऱ्हाळ घरांवर आणले जातात. मात्र, पाच वर्षांत कामगार येण्याच्या प्रमाणात दरवर्षी १० ते २० टक्के घट होत आहे. यंदाही जवळपास १५ हजार गुळकरी कामगार येथे आले. तेच जवळपास दीडशे गुऱ्हाळ घरांवर काम करत आहेत.

औरंगाबाद येथे झालेल्या औद्योगिक वसाहतीत गुळकरी कामगारांची नवी पिढी बारमाही नोकरीला जाऊ लागली. त्यामुळे घरच्या पारंपरिक गूळ बनवण्याच्या उद्योगात नवी पिढी फारशी येत नाही, परिणामी मराठवाड्यातून कोल्हापूरला गूळ बनविण्यासाठी येणाऱ्यांमध्ये पन्नाशी पूर्ण केलेले बहुतेक गुळवे किंवा गूळ कामगार येत आहेत. त्यांची एकूण संख्या घटली आहे.

मनुष्यबळ शोधण्यात वेळ गेल्याने यंदाचा गूळ हंगाम सुरू होण्यासाठी पंधरा दिवसांचा उशीर झाला. पूर्वी २४ तासांत चार ते सहा आदणे होत होती. सध्या दोन किंवा तीन आदणे होतात. अपवादात्मक गुऱ्हाळ घरांवर रात्रीचे गूळ उत्पादन घेतले जाते. त्यामुळे एकूण गूळ उत्पादन कमी झाले. त्यामुळे बाजारपेठेतील आवक निम्म्याने घटली आहे.

यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत दोनशे ते रुपयांनी भाव वाढला आहे. पण, मोजकाच गूळ बाजारात येत आहे. त्याचा मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ होतो. साखरेचे मिश्रण न करता गूळ बनवला तर गुळाला आणखी चांगला भाव मिळणार आहे.

आवक अशी

  • नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ ः १५ हजार ते २२ हजार गूळ रवे

  • डिसेंबर २०२३ ः १० हजार ते १४ हजार गूळ रवे.

सरासरी दर असे

  • २०२२ ः ४ हजार ते ४ हजार ३००

  • २०२३ ः ४ हजार ५०० ते ४ हजार ६००

  • १ किलो लहान गूळ रवे ः ३ हजार ८०० ते ४ हजार ७००

गूळ बनवण्यासाठी कामगारांची संख्या अपुरी आहे. मजुरी वाढती आहे. वीजपुरवठा, पाणी तसेच खाणपान असा हंगमातील एकूण खर्च गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढला. त्यामुळे गुऱ्हाळघर चालवणे जिकिरीचे बनले आहे. तरीही चांगल्या प्रतीचा गूळ बाजारपेठेत आणला जात नाही. त्यामुळे भाव वाढूनही फारसा नफा उरत नाही.

-बाजीराव पाटील, गूळ उत्पादक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali: ''आपण हास्यजत्रेच्या निवेदिका आहात, परंतु...'', मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणाऱ्या प्राजक्ता माळीला ठाकरे गटाचा टोमणा

Success Story: हवेली तालुक्यातील हर्षद शिंदेंचे एव्हिएशन क्षेत्रात यश; अधिकृत ऑडिटर पॅनलमध्ये समावेश, देशातील केवळ ११ यशस्वी उमेदवारांमध्ये निवड!

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख नारायणगाव केसरीचा मानकरी, विजेत्या पैलवानांना 15 लाखाचा इनाम, भारत केसरी निरु गुज्जरवर एकेरी पट!

Summer Roof Cooling Tips: बाहेर कमी घरातच उन्हाचे चटके बसतायत? मग छताची उष्णता कमी करण्यासाठी फॉलो करा 'हे' स्मार्ट जुगाड

New Scam : मोबाईल वापरताना छोटीशी चूक! अकाऊंट मधले पैसे हळूहळू होतील गायब; पटकन बदलून घ्या एक सेटिंग अन् डायल करा 'हा' नंबर

SCROLL FOR NEXT