Sharad Pawar Jayant Patil esakal
कोल्हापूर

'पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करा'; 'या' 5 जागांबाबत जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Jayant Patil : लोकसभा निवडणुकीत झालेल्या तडजोडीमुळे पारंपरिक लोकसभेच्या दोन्ही जागा पक्षास सोडाव्या लागल्या.

सकाळ डिजिटल टीम

'पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून उमेदवार निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून जीवाचे रान करा.'

कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागा वाटपावेळी तुम्ही केलेल्या कागल, चंदगडसह पाच जागांच्या मागणीबाबत निश्चितपणे चर्चा करणार आहे. या पाचही मतदारसंघांतील कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी येथे केले.

येथील विमानतळावरून सांगलीकडे जात असताना त्यांनी उजळाईवाडीमध्ये आयोजित पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यात जिल्ह्यातील दहापैकी पारंपरिक तीन जागा चंदगड, राधानगरी-भुदरगड, कागल या ''राष्ट्रवादी''कडे असल्याने शंभर टक्के या जागा आम्ही लढवणार आहे.

Jayant Patil

याबरोबरच लोकसभा निवडणुकीत झालेल्या तडजोडीमुळे पारंपरिक लोकसभेच्या दोन्ही जागा पक्षास सोडाव्या लागल्या असल्याने विधानसभेच्या निवडणुकीत तरी इचलकरंजी आणि कोल्हापूर उत्तर या दोन जागा तरी महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या पक्षास मिळाव्यात असे प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे केली आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिली.

कार्याध्यक्ष अनिल घाटगे, रावसाहेब भिलवडे, माजी आमदार राजीव आवळे, महिला यावेळी जिल्हाध्यक्ष अश्विनीदेवी माने, शहराध्यक्ष पद्मजा तिवले, युवक अध्यक्ष रोहित पाटील, इचलकरंजीचे मदन कारंडे, गडहिंग्लजचे अमरसिंह चव्हाण, शिवाजी खोत उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी आभार मानले.

‘पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहा’

पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून उमेदवार निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून जीवाचे रान करा. तिकीट मागायचा अधिकार हा प्रत्येकाला आहे; परंतु पक्ष एकाच उमेदवाराला तिकीट देणार असल्याने उर्वरित इच्छुकांनी पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहायचे आहे, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT