कोल्हापूर

यंदा गावपातळीवरही होणार पूराचे नियोजन : जयंत पाटील

सुनील पाटील

कोल्हापूर : अलमट्टी धरणातून (almatti dam) पाण्याचा विसर्ग गतीने व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. एनडीआरएफची (NDRF) तुकड्या तैनात केल्या जातील. मात्र, यावर्षीपासून गावागावात आणि शहरातील पाणी पातळी किती वाढेल? किती घरांना याचा फटका बसणार तसेच आपत्तीमध्ये सापडलेल्या लोकांचे स्थलांतर (migration of people) कसे करावे याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. यासाठी, दहा ते पंधरा दिवसात नकाशा तयार केला जाईल. त्याचे वाचन कसे करावे, याचाही आराखडा तयार केला जाईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी आज दिली. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जलसंपदा अधिकारी व सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मंत्र्यांची आज पूरपरिस्थितीचे नियंत्रण व काळजी कशी घ्यावी यापार्श्‍वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, पावसाळ्यात मर्यादित पाऊस पडेल. पण अतिवृष्टी होवून नद्यांना पुर आला तर विशेष काळजी घेतली जाणार आहे. जलसंपदा व महसूल विभाग आतापासूनच दक्ष आहे. मानवी मर्यादेबाहेर पाऊस पडला तर कर्नाटक राज्याशीही (contant with karnatak flud condition) आपण संपर्कात आहोत. काही दिवसांपूर्वी सर्व राज्यांच्या सचिवांसोबत बैठक घेतली आहे. कर्नाटक राज्य आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्र्यांची बैठक झाली आहे. अलमट्टी धरणाबाबतही ही चर्चा केली आहे. भविष्यातही अलमट्टी धरणातून पाण्याचा विर्सग किती होणार यावर चर्चा केली जाणार आहे.

याशिवाय, गावागावातील नदीतून किती पाणी येणार ? गावात आणि शहरात किती पाणी वाढणार याचा मॅपिंग केले जाणार आहे. यामुळे, जलसंपदा अधिकारी, महसूल विभाग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, बीडीओ तसेच जिल्हा परिषदेचे इतर कर्मचारी यांना विश्‍वासात घेवून त्या-त्या भागातील माहिती घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.

कोरोना संसर्गामध्ये लोकांना स्थलांतर करतान काळजी घ्यावी लागेल, पण सध्या स्थलांतरण करावे लागले अशी परिस्थिती नाही. गेल्यावर्षीच्या पूरातुन आपण सुखरुप बाहेर पडलो. यावर्षी किती पाऊस पडतो, हे पाहायला हवं. दरम्यान, त्या-त्या वेळी उद्धभवणाऱ्या परिस्थितीनूसार पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय घेतील, असेही पाटील यांनी सांगितेल.

गावपातळीवर असे होणार नियोजन

गावागावात पूराचा फटका बसतो. अशावेळी ग्रामपंचायती किंवा ग्रामसमित्यांना खबरदारीबाबत योग्य त्या सूचना दिल्या जातील. कोवाड सारख्या गावात छोट्या धरणामुळे पाणी शिरते. यापार्श्‍वभूमीवर आधीच ताम्रपर्णी मोकळी करण्याबाबत सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

आमदार, खासदारांच्याही सूचना

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय मंडलिक, श्रीनिवास पाटील यांनी पूरस्थितीशी सामना करण्यासाठी सूचना केल्या. याचाही विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितेल.

अलमट्टींच्या उंचीबाबत

अलमट्टीचे पाणी वाढते त्यावेळी हिप्परगीचे पाणी दिसत नाही. हिप्परगी प्रकल्प आहे. अलमट्टीचे जिथपर्यंत पाणी साठवू शकते. तिथेपर्यंत पाणी जाण्यास अडथळ होतो. जास्ती-जास्त पाणी लिप्ट करुन दिले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT