'...तर मी राजीनामा द्यायला तयार'; संभाजीराजे छत्रपती

संभाजीराजे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाहणीसाठी मालवणात
'...तर मी राजीनामा द्यायला तयार'; संभाजीराजे छत्रपती

मालवण : मराठा आरक्षणाच्या विषयावर (topic of maratha reservation) आपण आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. मी राजीनामा देऊन आरक्षण मिळणार असेल तर तो नक्कीच देईन, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी (sambhajiraje chhatrapati) राजीनाम्याबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम दिला. तौक्ते चक्रीवादळामुळे (tauktae cyclone effects) येथील किल्ले सिंधुदुर्गवर झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज खासदार छत्रपती संभाजीराजे येथे आले होते; मात्र समुद्र खवळलेला असल्याने त्यांनी बंदर जेटीवरूनच त्यांनी छत्रपतींचे दर्शन घेतले.

पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “तौक्ते वादळामुळे किल्ले सिंधुदुर्गवर झालेल्या नुकसानीची पाहणीसाठी येथे आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या (chhatrapati shivaji maharaj) सिंधुदुर्ग किल्ल्यात त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी शिवराजेश्‍वर हे पहिले मंदिर बांधले तर या मंदिराचा सभामंडप राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बांधला. तेव्हापासून दरवर्षी कोल्हापूरच्या छत्रपतींकडून या मंदिरात शिवाजी महाराजांना पेहेराव दिला जातो. हा पेहेराव देण्यासाठी मी दरवर्षी किल्ल्याला भेट देतो; मात्र कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात येथे येऊ शकलो नाही. (covid-19) त्यामुळे पेहेराव देण्यासाठी, शिवरायांना वंदन करण्यासाठी आणि त्याचबरोबर किल्ल्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलो आहे. समुद्र खवळलेला असल्याने मला किल्ल्यावर जाता आले नाही; परंतु लवकरच किल्ल्याला भेट देणार आहे.”

'...तर मी राजीनामा द्यायला तयार'; संभाजीराजे छत्रपती
आता जादा दराने खत विक्री केल्यास गुन्हा दाखल होणार

ते म्हणाले, “शेकडो वर्षे प्रतिकूल परिस्थितीत किल्ल्यातील रहिवासी वास्तव्य करत आहेत. त्यांना कशाप्रकारे मदत करता येईल याबाबत मी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहे. पावसाळा सुरू झाला असून किल्ल्यातील कामे कशी पूर्ण करता येतील याबाबत चर्चा करणार आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा कोल्हापूर संस्थांनच्या हद्दीतील किल्ला होता. त्यामुळे या किल्ल्याची जबाबदारी आमचीही आहे असे मी समजतो. किल्ल्याचे संवर्धन व जतन व्हावे यासाठी खास परवानगी घेतली आहे. रायगड प्राधिकरण अंतर्गत रायगड किल्ल्याचे काम करत आहोत. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाचे काम करण्याचा आपला प्रयत्न आहे; मात्र येथील जिल्हाधिकार्‍यांनी किल्ल्यातील शिवरायांच्या मंदिराच्या सभामंडपच्या जीर्णोद्धाराचे काम त्यांच्या विभागाकडून करून घेण्याचे म्हटले होते. तरीही किल्ल्यात कोणत्या सुविधा निर्माण करता येतील याबाबत जिल्हाधिकार्‍यांशी बोलणार आहे.”

यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून संभाजी राजे यांना विचारले असता त्यांनी आपण राजीनामा देणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले. आपण राजीनामा दिल्याने आरक्षण मिळणार का ? राजीनामा देऊन आरक्षण मिळणार असेल तर राजीनामा देतो, असे सांगत राजीनाम्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले, “मराठा आरक्षणावर माझी भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. मी समाजासाठी काम करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना बारा बलुतेदारांचे स्वराज्य निर्माण केले. शाहू महाराजांनी 1902 मध्ये बहुजन समाजाला आरक्षण दिले. त्यात अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, मराठा समाज यांचा समावेश होता. त्यामुळे बहुजन समाजाला न्याय देताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आपली भूमिका आहे. मी कोणावर टीका करत नाही आणि जे टीका करतात तो ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. मी मराठा समाजाला दिशा देण्यासाठी व न्याय देण्यासाठी काम करत आहे.”

'...तर मी राजीनामा द्यायला तयार'; संभाजीराजे छत्रपती
मरियाना ट्रेंच...पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com