jayant patil jayant patil
कोल्हापूर

सचिन वाझे प्रकरणात ‘एक नंबर’ म्हणजे मुंबईचे पोलिस आयुक्तच

खाकी वर्दीतले दोन-तीन लोकच वसुली करत होते - जयंत पाटील

अजित झळके

सांगली : खाकी वर्दी घातलेले दोन-तीन लोकच समाजातील विविध घटनांना त्रास देऊन वसुली करत होते. ते स्वतःसाठीच पैसे गोळा करायचे. या प्रकरणात ‘एक नंबर’ म्हणजे मुंबईचे पोलिस आयुक्त आहेत. त्यात अनिल देशमुख यांचा काहीही संबंध नाही. ते दोषी नाहीत, हे जनतेला कळालेले आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज दिली.

अनिल देशमुख यांच्याविषयीचा अहवाल समोर आल्यानंतर पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी, खासकरून ठाणे, मुंबईतील अनेक व्यावसायिकांनी तक्रारी केल्या. त्यात पोलिस अधिकारी वाझे ज्या पद्धतीने खंडणी उकळत होते, त्रास देत होते, याचे वर्णन करण्यात आले होते. त्याबाबतचे काही टेप सापडले आहेत. त्यात वाझे कुणासाठी पैसे गोळा करत होते, एक नंबर म्हणजे कोण हे स्पष्टपणे सांगितले आहे.

आणखी एका संभाषणात एक व्यक्ती समोर आली आहे, जी वाझे आणि परमवीर सिंग यांच्याशी संबंधीत आहे. त्या संभाषात 'पुढच्या दहा बारा दिवसांत एका मंत्र्याला टार्गेट करण्यात आले आहे, ईडी-सीबीआय मागे लावणार आहोत, जेणेकरून हे सरकार जाईल आणि पुन्हा आपल्या मनासारखे पोलिस आयुक्त होतील’,अशा आशयाचे संभाषण आहे.

अनिल देशमुख यांच्याविषयीचा अहवाल समोर आल्यानंतर जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली.

अलिकडेही काही गुन्हे दाखल आहेत. त्यातही संभाषण समोर आली आहेत. एक नंबर म्हणजे मुंबईचे सीपी हे पुन्हा पुन्हा सांगण्यात आले आहे. त्याचा अर्थ सरळ आहे, एक नंबर म्हणजे अनिल देशमुख नव्हते, याचा पर्दाफाश झाला आहे. एक नंबर म्हणजे मुंबईचे सीपीच आहेत. देशमुख निष्पाप आहे, हे सिद्ध होते आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT