Jayanti Nala Sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : जयंती नाला भरला प्लास्टिक कचऱ्याने

राज्य शासनाने जाहीर केलेली प्लास्टिक बंदी शहरात बासनात गुंडाळून ठेवल्याचे जयंती नाल्याच्या ठिकाणी पहायला मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्य शासनाने जाहीर केलेली प्लास्टिक बंदी शहरात बासनात गुंडाळून ठेवल्याचे जयंती नाल्याच्या ठिकाणी पहायला मिळत आहे.

कोल्हापूर - राज्य शासनाने जाहीर केलेली प्लास्टिक (Plastic) बंदी शहरात बासनात गुंडाळून ठेवल्याचे जयंती नाल्याच्या (Jayanti Nala) ठिकाणी पहायला मिळत आहे. नाल्यातून वाहत आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्यांच्या कचऱ्याने जयंती नाला व्यापून गेला आहे. एखादा मोठा पाऊस झाल्यास हा सर्व कचरा वाहून थेट पंचगंगा नदीत मिसळणार आहे. नदी प्रदूषणामध्ये भर घालण्याऐवजी तातडीने हा कचरा उचलला जाण्याची आवश्‍यकता आहे.

सरकारने जाहीर केलेल्या प्लास्टिक बंदीनंतर महापालिकेने कारवाई केली; पण कोरोनानंतर ती कारवाई कमी झाली व विक्रेत्यांकडे बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या जवळपास सर्वत्र उपलब्ध होऊ लागल्या. त्या कचऱ्यातून आल्या तर त्यांचे विलगीकरण करून त्याचा धोका कमी करता येऊ शकत होता; पण शहराच्या विविध भागातून वाहत असलेल्या गटारी, नाल्यांमधून येणारे प्लास्टिक रोखण्यासाठी काहीच उपाययोजना नाही. जयंती नाल्यावर हा कचरा आल्यानंतर महापालिका त्याचा उठाव करत होती. त्यासाठी जयंती नाल्यावर कर्मचारी नेमले होते. सध्या तो कचरा काढला गेला नसल्याने नाला प्लास्टिकच्या कचऱ्याने भरला आहे.

सध्या वळीव पावसाची शक्यता आहे. पाऊस झाल्यास नाला ओसंडून वाहून कचरा थेट पंचगंगा नदीत जाणार आहे. नदी प्रदूषण रोखण्याबाबत सर्व पातळीवर प्रयत्न केले जात असताना या प्रकारामुळे साऱ्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाणार आहे. महापालिकेने हा कचरा तातडीने उचलल्यास त्यातून होणारे नदी प्रदूषण रोखले जाऊ शकते.

राजारामपुरी चौकानजीक कायम ढिग

राजारामपुरी पोलिस चौकीसमोर असलेल्या नाल्यात दररोज प्लास्टिकच्या बाटल्या तसेच पिशव्या मोठ्या प्रमाणावर साचलेल्या दिसतात. त्याचवेळी जर हा कचरा उठवला तर नाल्यात येणाऱ्या या कचऱ्याचेप प्रमाण थोडे कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू; संपूर्ण प्रहार संघटनेसह बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश

Indeed AI : आता मित्र समजून ChatGPT कडे मागा नोकरी! रिमोट जॉब असो किंवा वर्क फ्रॉम होम, सगळंकाही मिळणार एका क्लिकवर

EPFO PF Withdrawal New Rule : पीएफ काढण्याच्या नियमात बदल; आता 'या' फॉर्मशिवाय तुम्हाला मिळणार नाहीत पैसे

Tatya Tope Letter: तात्या टोपेंची सही असलेलं 1857 चं पत्र सापडलं; ऐतिहासिक क्रांतीचं गुपित झालं उघड

९० वर्षीय महिलेला दिलासा, २० वर्षे सुनावणी घेऊ नये म्हणणाऱ्या हायकोर्टानं बदलला आदेश, दिली पुढची तारीख

SCROLL FOR NEXT