jewellery theft in kolhapur murgud 
कोल्हापूर

धक्कादायक ; घरात घुसून लुबाडले सासू-सुनेचे दागिने 

सकाळ वृत्तसेवा

मुरगूड : हमिदवाडा (ता. कागल) येथील सासू-सूनेला चाकूचा दाखवून 3 लाख 25 हजारांचे सोन्याचे साडेसहा तोळ्याचे दागिने पळविले. घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, हमिदवाडा (ता. कागल) येथील माळवाडी येथील घरात सोमवारी (ता. 30) रात्री साडेअकराच्या सुमारास पूजा एकनाथ वरुटे व तिची सासू बेबीताई वरुटे टीव्ही पाहत होत्या. यावेळी अनोळखीने पूजा यांचे पती एकनाथ यांच्या नावाने हाक मारली. कोण आहे हे पाहण्यासाठी पूजाने दार उघडताच अनोळखीने चाकूचा धाक दाखवून दागिने काढून द्यायला सांगितले. त्याचवेळी अनोळखीने सासू बेबीताई यांचे तोंड दाबून धरले. झटापटीत बेबीताईंच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाला जखम झाली. त्या व्यक्तींने सोने द्या नाहीतर चाकू पोटात खुपसणार अशी भीती घातली. तसेच मुलगा कामावरुन घरी येत असताना त्याला वाटेतच मारणार असे धमकावले. त्यामुळे घाबरलेल्या बेबीताई व पूजाने सोन्याचे अडीच तोळे वजनाचे 1 लाख 25 हजारांचे गंठण, काळे मणी असलेले दीडतोळे वजनाचे 75 हजार रुपयांचे मणीमंगळसूत्र, दोन तोळे वजनाचा एक लाख रुपयांचा सोन्याचा नेकलेस व 25 हजार रुपयांची कानातील सोन्याची अर्धा तोळे वजनाची दोन कर्नफुले असा एकूण 3 लाख 25 हजार रुपयांचे ऐवज हातोहात लंपास केला.

बाहेर जाताना दरवाजाला बाहेरील बाजूने कडी लावली. तेथून पळ काढला. याबातची फिर्याद पूजा वरुटे यांनी मुरगूड पोलिसांत दिली असून अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं! दोन एकर जमिनीसाठी सख्ख्या भावासह वडिलांचा कुऱ्हाड-खोऱ्याने खून; हिंगणगावात विहिरीशेजारी नेमकं काय घडलं?

Land Acquisition: आनंदाची बातमी! भूसंपादनाच्या दाव्यांसाठी ५७ लवादांची नियुक्ती; रखडलेले २८ हजारांहून अधिक प्रकरणे निकाली निघणार

Vidarbha News: मेहकर-चिखली रस्त्यावर भाविकांची पिकअप उलटली; लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे दोन ठार, १७ जखमी

Vidarbha News:मित्राला बांधून ठेवत मैत्रिणीवर अत्याचार; लूटमारीचाही आरोप : कटात सहभागी पाच जणांना अटक

Uday Samant: उद्योगांना पाइपद्वारे गॅसपुरवठा; उद्योगमंत्री उदय सामंत यांची आढावा बैठकीत घोषणा, काळाबाजार करणाऱ्या कडक कारवाई!

SCROLL FOR NEXT