job recruitment of health department Exams for different posts same day education marathi news 
कोल्हापूर

मेगा भरती; आता विविध पदांसाठी एकाच दिवशी होणार परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यातील आरोग्य सेवा विभागात विविध पदांची मेगा भरती होणार आहे. त्यासाठी २८ फेब्रुवारीला विविध पदांच्या परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळे ज्यांनी एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज केले आहेत, अशा उमेदवारांना उर्वरित पदांची परीक्षा द्यावी कधी, असा पेच निर्माण झाला आहे.

राज्यभरात अशा हजारो उमेदवारांची कोंडी झाली आहे. आरोग्य सेवा विभागाने यावर तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागात ४० पदांवर भरती होणार आहे. यात आरोग्य कर्मचारी, वस्त्र पाल, नळकारागीर, दूरध्वनी चालक, सहाय्यक परिचारिका, प्रयोगशाळा सहाय्यक, वीजतंत्री, अनुजीव सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, नेत्रचिकित्सा अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञ, मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका, समुपदेश, रासायनिक सहायक, रक्तपेढी तंत्रज्ञ आदी चाळीस पदांवर भरती होणार आहे. त्यासाठी सेवा विभागाने २०१९ मध्ये अर्ज मागवले होते.

राज्यभरातून जवळपास दोन लाखाहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात बहुतेक उमेदवारांनी शैक्षणिक अहर्ता व अनुभवानुसार दोनपेक्षा अधिक पदांवर अर्ज भरले आहेत. एका पदाच्या अर्जासाठी कमीत कमी पाचशे रुपये शुल्क याप्रमाणे जितक्‍या पदांसाठी अर्ज केला तितक्‍या पदांची शुल्क उमेदवारांनी भरले आहे. त्यानुसार वरील पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार असून त्याचे आदेश आरोग्य सेवा विभागाने नुकतेच पाठवले आहेत. त्यात २८ फेब्रुवारीला सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे. या सर्व पदांसाठीच्या परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत. 

उमेदवारांतून नाराजी
हॉल तिकीट परीक्षेच्या अगोदर आठ दिवस मिळेल, असे सांगण्यात आले आहे. हॉल तिकीटवरच ठिकाण व वेळ याचे तपशील असणार आहेत. त्यामुळे परीक्षा कोठे होणार, याची माहिती नाही. एकाच पदाची परीक्षा दिल्यास उर्वरित पदांच्या परीक्षेसाठी भरलेले शुल्क परत मिळणार की नाही, याविषयीही माहिती नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : लासलगावमध्ये एकतर्फी प्रेमाच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला...

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT