जोतिबा
जोतिबा  sakal
कोल्हापूर

जोतिबा चैत्र यात्रा विशेष|दक्षिण काशी असा नावलौकिक असणारे दख्खनचा राजा जोतिबा

सकाळ वृत्तसेवा

तीर्थक्षेत्रे अनेक आहेत; परंतु दक्षिण काशी असा नावलौकिक असणारे दख्खनचा राजा जोतिबा, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई)यांच्या वास्तव्याने पावन झालेले एक अनुपम क्षेत्र असा ज्याचा उल्लेख करावा लागेल ते म्हणजे करवीर काशी. जोतिबा डोंगराचा पुराणात ‘मैनागिरी पर्वत’ असा उल्लेख आढळतो. अनेक देव-देवतांची मालिका आपणाला अखंड हिंदुस्थानभर दिसेल. त्यातील सर्व देवतांमध्ये श्री केदारनाथाचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. हा देव सर्व अवतारांमध्ये पूर्ण अवतार आहे. दख्खनचा राजा हे नाव श्री महालक्ष्मीने केदारनाथांना अर्पण केले.

ज्यावेळी श्री महालक्ष्मी करवीरवर राज्य करीत होती

त्यावेळी करवीरासुर, कोल्हासुर या राक्षसांनी त्रास देण्यास सुरुवात केली होती. तेव्हा सर्व देवांच्या विनंतीवरून पूर्णब्रह्म सनातन अशा ज्योतिर्मय स्वरूपाच्या रूपात जोतिबा अवतीर्ण झाले आणि सर्व राक्षसांच्या त्रासातून श्री महालक्ष्मीची सुटका झाली. जेव्हा केदारनाथ परत हिमालयाकडे जाण्यास निघाले तेव्हा महालक्ष्मीने त्यांना थांबण्याची विनंती केली. श्री महालक्ष्मीच्या विनंतीवरून केदारनाथ करवीरकडे दक्षिण दिशेला कृपादृष्टी करून उभे राहिले. त्यावेळी सर्व ऋषी, देव व महालक्ष्मी देवीने त्यांचा दक्षिणाधीश दख्खनचा राजा असा गौरव केला.

श्री केदारनाथाने जोतिबा डोंगराभोवती बारा ज्योतिर्लिंगे स्थापन केली. म्हणून त्यांना ज्योतिर्लिंग असेही म्हणतात. बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करताना त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या मूळ अवतीर्ण ठिकाणांचे स्मरण म्हणून हिमालयातील बद्रिकेदार लिंग स्थापन केले म्हणून त्यांना केदारलिंग असेही म्हणतात. रवळनाथ हे नाव त्यांनी धारण करण्यामागे मोठा इतिहास आहे. कोपलेल्या जमदग्नींनी रेणुकेचा वध केला व स्त्री हत्येचे पातक त्यांच्या माथी बसले. त्यामुळे जमदग्नी ऋषींनी आपल्या रागाचा त्याग केला. त्यामुळे सर्व देवांच्या विनंतीवरून केदारनाथांनी राग धारण केला. म्हणून त्यांना रवळनाथ असेही म्हणतात.

द्वापार युगाच्या शेवटी पृथ्वीवर कोल्हासुर, रक्तभोज, महिषासुर, रत्नासुर यांसारखे अनेक राक्षस शिवशंकराच्या वरदानाने उन्मत्त झाले होते. त्यातच भर पडली ती अगस्ती शिष्य विंध्याद्रीची. नारदांनी त्याला हिमालयाशी बरोबरी न करण्यातच तुझा शहाणपणा आहे, असे हिणवल्यामुळे तो चिडला व तो हिमालयाशी स्पर्धा करू लागल्यामुळे त्याच्या उंचीने सूर्यालाही अडथळा निर्माण झाला. तेव्हा महालक्ष्मीने अगस्तींना दक्षिण यात्रेला जाणे भाग पाडले.

अगस्तींच्या दक्षिण यात्रेमुळे विंध्याद्रीचा अडथळा दूर झाला. तेव्हा सर्व देवांनी योगमायेची आराधना केली व योगमायेने ज्योतिर्मय स्वरूपाला विनवले व पृथ्वीवर अवतारित होण्यासाठी साकडे घातले. त्यावेळी हिमालयावर पौंगड ऋषी व विमलांबुजा हे उभयता सनातन ज्योतिर्मय स्वरूपाने पोटी अवतार घ्यावा म्हणून घोर तपश्चर्या करीत होते. तेव्हा त्यांची घोर अशी ब्रह्म कल्पपर्यंतची तपश्चर्या पाहून ज्योतिर्मय स्वरूप अशा परमेश्वराने त्यांच्या इच्छेनुसार पोटी अवतार न घेता अयोनी संभव म्हणजे कोणत्याही योनीतून जन्म न घेता बालकाच्या रूपात ज्योतिर्मय स्वरूप सनातन पूर्णबह्म असे केदारनाथ (जोतिबा) प्रकट झाले. तो दिवस चैत्र शुद्ध षष्ठीयुक्त सप्तमीचा होता. तेच हे जोतिबाचे रूप आहे.जोतिबाला गुलाल, दवणा, खोबरे, खारीक प्रिय आहे. दवण्याचा गंध हा रज, तम, सत्त्व गुणयुक्त आहे. जोतिबाची मूर्ती चतुर्भुज असून, हाती खड्ग, त्रिशूल, डमरू या आयुधांसह उभी आहे. त्यांचे वाहन घोडा आहे.

निनाम पाडळी : कोल्हापूर-पुणे महामार्गावर सातारा तालुक्यातील नागठाणे या गावापासून पाच किलोमीटरवर निसर्गरम्य परिसरात वसलेले गाव म्हणजे निनाम पाडळी. जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील चैत्र यात्रेत सामील होणाऱ्या मानाच्या ९६ सासनकाठ्यांच्या मिरवणुकीत पहिला मान निनाम पाडळीच्या सासनकाठीस आहे. या निशाणाची नोंद कोल्हापूर तहसील कार्यालयात व इतिहासकालीन ताम्रपटावर आहे. सुमारे ३० ते ३५ मीटर उंचीचे जाड निशाण, पांढरा फरारा व तीन चुनी तोरणे बांधलेले असते. सासनकाठी खांद्यावर घेऊन नाचणे व तोरण्या सांभाळणे हे अतिशय कौशल्याचे काम असते. निनाम पाडळी येथून प्रतिवर्षी जोतिबाकडे २० ते २५ बैलगाड्या या मानाच्या सासनकाठीसोबत जातात. सोबत हजारो ग्रामस्थ, भाविक पायी प्रवास करतात. सासनकाठी जोतिबाकडे मार्गस्थ होताना रस्त्यात ठिकठिकाणी गावोगावी दर्शनासाठी मोठी गर्दी होते. सुहासिनी महिला निशाणास ओवाळण्यासाठी येतात. भाविक मंडळी निशाणास विविध आकर्षक हार, तोरण, नोटांच्या माळा व नारळांची तोरणे अर्पण करतात.

विहे, ता. पाटण, जि. सातारा : जोतिबा चैत्र यात्रेत दुसरा मान आहे तो विहे गावच्या मानाच्या सासनकाठीस. या गावातील जोतिबा मंदिरात जोतिबा व काळभैरव एका सिंहासनावर आहेत. गुढीपाडव्यादिवशी नदीवर सासनकाठी स्वच्छ धुऊन ती गावात आणली जाते. त्यानंतर पूजन करून ती मंदिरासमोर ठेवली जाते. कामदा एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जोतिबा चैत्र यात्रेसाठी नेली जाते. संपूर्ण विहे गाव या सासनकाठीसोबत असते.

कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली : चैत्र यात्रेत तिसऱ्या क्रमांकाची सासनकाठी आहे ती कसबे डिग्रजची. ही काठी हिम्मतबहाद्दर चव्हाण घराण्याची. या घराण्यात चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) मुहूर्तावर काठी दारात उभी केली जाते. काठीच्या वरच्या बाजूला मोठी पताका

सोडलेली असते. पांढऱ्या रंगाचे शांतीचे प्रतीक हे चव्हाण घराण्याचे निशाण आहे. ही सासनकाठी चैत्र यात्रेच्या आदल्या दिवशी येते. ग्रामस्थ काठीसोबत असतात.

किवळ, ता. कऱ्हाड, जि. सातारा : या गावची सासनकाठी नावजी बुवाची काठी म्हणून प्रसिद्ध माहे. ही काठी जोतिबा डोंगर येथे चैत्र यात्रेच्या अगोदर एक दिवस येते. नारळाची तोरणे मोठ्या भक्तिभावाने भाविक वाहतात. संपूर्ण किवळ गाव जोतिबा चैत्र यात्रेला येते. या गावात नावजी बुवा व जोतिबाचे भव्य मंदिर लोकवर्गणीतून बांधण्यात आले आहे. यासाठी सुमारे ३५ लाख खर्च आला आहे. किवळ गावात नावजीचा आड व तळे प्रसिद्ध आहे. पूर्ण गावच भक्तिमय आहे.

हिम्मतबहाद्दर चव्हाण सरकार, निगवे दुमाला (ता. करवीर), कसबा सांगाव (ता. कागल), छत्रपती करवीर, कवठे गुलंद (ता. शिराळा), मौजे मनपाडळे (ता. हातकणंगले), दरवेश पाडळी (ता. हातकणंगले), सांगलवाडी, फाळकेवाडी, विठ्ठलवाडी या गावच्याही इतर मानाच्या सासनकाठ्या असून त्या मोठ्या दिमाखात जोतिबा चैत्र यात्रेस येतात.

ज्या गावात सासनकाठ्या आहेत त्या ठिकाणी गुढीपाडव्यास चैत्र यात्रेस येण्यासाठी बैठका होतात. नियोजन करण्यात येते. सासनकाठ्या या जोतिबा चैत्र यात्रेचे वैभव आहे.

तीर्थक्षेत्रे अनेक आहेत; परंतु दक्षिण काशी असा नावलौकिक असणारे दख्खनचा राजा जोतिबा, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई)यांच्या वास्तव्याने पावन झालेले एक अनुपम क्षेत्र असा ज्याचा उल्लेख करावा लागेल ते म्हणजे करवीर काशी. जोतिबा डोंगराचा पुराणात ‘मैनागिरी पर्वत’ असा उल्लेख आढळतो. अनेक देव-देवतांची मालिका आपणाला अखंड हिंदुस्थानभर दिसेल. त्यातील सर्व देवतांमध्ये श्री केदारनाथाचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. हा देव सर्व अवतारांमध्ये पूर्ण अवतार आहे. दख्खनचा राजा हे नाव श्री महालक्ष्मीने केदारनाथांना अर्पण केले.

ज्यावेळी श्री महालक्ष्मी करवीरवर राज्य करीत होती

त्यावेळी करवीरासुर, कोल्हासुर या राक्षसांनी त्रास देण्यास सुरुवात केली होती. तेव्हा सर्व देवांच्या विनंतीवरून पूर्णब्रह्म सनातन अशा ज्योतिर्मय स्वरूपाच्या रूपात जोतिबा अवतीर्ण झाले आणि सर्व राक्षसांच्या त्रासातून श्री महालक्ष्मीची सुटका झाली. जेव्हा केदारनाथ परत हिमालयाकडे जाण्यास निघाले तेव्हा महालक्ष्मीने त्यांना थांबण्याची विनंती केली. श्री महालक्ष्मीच्या विनंतीवरून केदारनाथ करवीरकडे दक्षिण दिशेला कृपादृष्टी करून उभे राहिले. त्यावेळी सर्व ऋषी, देव व महालक्ष्मी देवीने त्यांचा दक्षिणाधीश दख्खनचा राजा असा गौरव केला.

श्री केदारनाथाने जोतिबा डोंगराभोवती बारा ज्योतिर्लिंगे स्थापन केली. म्हणून त्यांना ज्योतिर्लिंग असेही म्हणतात. बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करताना त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या मूळ अवतीर्ण ठिकाणांचे स्मरण म्हणून हिमालयातील बद्रिकेदार लिंग स्थापन केले म्हणून त्यांना केदारलिंग असेही म्हणतात. रवळनाथ हे नाव त्यांनी धारण करण्यामागे मोठा इतिहास आहे. कोपलेल्या जमदग्नींनी रेणुकेचा वध केला व स्त्री हत्येचे पातक त्यांच्या माथी बसले. त्यामुळे जमदग्नी ऋषींनी आपल्या रागाचा त्याग केला. त्यामुळे सर्व देवांच्या विनंतीवरून केदारनाथांनी राग धारण केला. म्हणून त्यांना रवळनाथ असेही म्हणतात.

द्वापार युगाच्या शेवटी पृथ्वीवर कोल्हासुर, रक्तभोज, महिषासुर, रत्नासुर यांसारखे अनेक राक्षस शिवशंकराच्या वरदानाने उन्मत्त झाले होते. त्यातच भर पडली ती अगस्ती शिष्य विंध्याद्रीची. नारदांनी त्याला हिमालयाशी बरोबरी न करण्यातच तुझा शहाणपणा आहे, असे हिणवल्यामुळे तो चिडला व तो हिमालयाशी स्पर्धा करू लागल्यामुळे त्याच्या उंचीने सूर्यालाही अडथळा निर्माण झाला. तेव्हा महालक्ष्मीने अगस्तींना दक्षिण यात्रेला जाणे भाग पाडले.

अगस्तींच्या दक्षिण यात्रेमुळे विंध्याद्रीचा अडथळा दूर झाला. तेव्हा सर्व देवांनी योगमायेची आराधना केली व योगमायेने ज्योतिर्मय स्वरूपाला विनवले व पृथ्वीवर अवतारित होण्यासाठी साकडे घातले. त्यावेळी हिमालयावर पौंगड ऋषी व विमलांबुजा हे उभयता सनातन ज्योतिर्मय स्वरूपाने पोटी अवतार घ्यावा म्हणून घोर तपश्चर्या करीत होते. तेव्हा त्यांची घोर अशी ब्रह्म कल्पपर्यंतची तपश्चर्या पाहून ज्योतिर्मय स्वरूप अशा परमेश्वराने त्यांच्या इच्छेनुसार पोटी अवतार न घेता अयोनी संभव म्हणजे कोणत्याही योनीतून जन्म न घेता बालकाच्या रूपात ज्योतिर्मय स्वरूप सनातन पूर्णबह्म असे केदारनाथ (जोतिबा) प्रकट झाले. तो दिवस चैत्र शुद्ध षष्ठीयुक्त सप्तमीचा होता. तेच हे जोतिबाचे रूप आहे.

जोतिबाला गुलाल, दवणा, खोबरे, खारीक प्रिय आहे. दवण्याचा गंध हा रज, तम, सत्त्व गुणयुक्त आहे. जोतिबाची मूर्ती चतुर्भुज असून, हाती खड्ग, त्रिशूल, डमरू या आयुधांसह उभी आहे. त्यांचे वाहन घोडा आहे.

निनाम पाडळी : कोल्हापूर-पुणे महामार्गावर सातारा तालुक्यातील नागठाणे या गावापासून पाच किलोमीटरवर निसर्गरम्य परिसरात वसलेले गाव म्हणजे निनाम पाडळी. जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील चैत्र यात्रेत सामील होणाऱ्या मानाच्या ९६ सासनकाठ्यांच्या मिरवणुकीत पहिला मान निनाम पाडळीच्या सासनकाठीस आहे. या निशाणाची नोंद कोल्हापूर तहसील कार्यालयात व इतिहासकालीन ताम्रपटावर आहे. सुमारे ३० ते ३५ मीटर उंचीचे जाड निशाण, पांढरा फरारा व तीन चुनी तोरणे बांधलेले असते. सासनकाठी खांद्यावर घेऊन नाचणे व तोरण्या सांभाळणे हे अतिशय कौशल्याचे काम असते. निनाम पाडळी येथून प्रतिवर्षी जोतिबाकडे २० ते २५ बैलगाड्या या मानाच्या सासनकाठीसोबत जातात. सोबत हजारो ग्रामस्थ, भाविक पायी प्रवास करतात. सासनकाठी जोतिबाकडे मार्गस्थ होताना रस्त्यात ठिकठिकाणी गावोगावी दर्शनासाठी मोठी गर्दी होते. सुहासिनी महिला निशाणास ओवाळण्यासाठी येतात. भाविक मंडळी निशाणास विविध आकर्षक हार, तोरण, नोटांच्या माळा व नारळांची तोरणे अर्पण करतात.

विहे, ता. पाटण, जि. सातारा : जोतिबा चैत्र यात्रेत दुसरा मान आहे तो विहे गावच्या मानाच्या सासनकाठीस. या गावातील जोतिबा मंदिरात जोतिबा व काळभैरव एका सिंहासनावर आहेत. गुढीपाडव्यादिवशी नदीवर सासनकाठी स्वच्छ धुऊन ती गावात आणली जाते. त्यानंतर पूजन करून ती मंदिरासमोर ठेवली जाते. कामदा एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जोतिबा चैत्र यात्रेसाठी नेली जाते. संपूर्ण विहे गाव या सासनकाठीसोबत असते.

कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली : चैत्र यात्रेत तिसऱ्या क्रमांकाची सासनकाठी आहे ती कसबे डिग्रजची. ही काठी हिम्मतबहाद्दर चव्हाण घराण्याची. या घराण्यात चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) मुहूर्तावर काठी दारात उभी केली जाते. काठीच्या वरच्या बाजूला मोठी पताका

सोडलेली असते. पांढऱ्या रंगाचे शांतीचे प्रतीक हे चव्हाण घराण्याचे निशाण आहे. ही सासनकाठी चैत्र यात्रेच्या आदल्या दिवशी येते. ग्रामस्थ काठीसोबत असतात.

किवळ, ता. कऱ्हाड, जि. सातारा : या गावची सासनकाठी नावजी बुवाची काठी म्हणून प्रसिद्ध माहे. ही काठी जोतिबा डोंगर येथे चैत्र यात्रेच्या अगोदर एक दिवस येते. नारळाची तोरणे मोठ्या भक्तिभावाने भाविक वाहतात. संपूर्ण किवळ गाव जोतिबा चैत्र यात्रेला येते. या गावात नावजी बुवा व जोतिबाचे भव्य मंदिर लोकवर्गणीतून बांधण्यात आले आहे. यासाठी सुमारे ३५ लाख खर्च आला आहे. किवळ गावात नावजीचा आड व तळे प्रसिद्ध आहे. पूर्ण गावच भक्तिमय आहे.

हिम्मतबहाद्दर चव्हाण सरकार, निगवे दुमाला (ता. करवीर), कसबा सांगाव (ता. कागल), छत्रपती करवीर, कवठे गुलंद (ता. शिराळा), मौजे मनपाडळे (ता. हातकणंगले), दरवेश पाडळी (ता. हातकणंगले), सांगलवाडी, फाळकेवाडी, विठ्ठलवाडी या गावच्याही इतर मानाच्या सासनकाठ्या असून त्या मोठ्या दिमाखात जोतिबा चैत्र यात्रेस येतात.

ज्या गावात सासनकाठ्या आहेत त्या ठिकाणी गुढीपाडव्यास चैत्र यात्रेस येण्यासाठी बैठका होतात. नियोजन करण्यात येते. सासनकाठ्या या जोतिबा चैत्र यात्रेचे वैभव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT