jotiba mandir closed because of corona effect 
कोल्हापूर

जोतिबा मंदिर सलग दुसऱ्या दिवशीही बंद.... 

निवास मोटे

जोतिबा डोंगर - श्री. क्षेत्र जोतिबा डोंगर ता. पन्हाळा येथील दख्खनचा राजा जोतिबा देवाचे मंदिर कोरोनाचा संभाव्य संसर्ग टाळ्ण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आले. त्यामुळे आजही भाविकांची गैरसोय झाली. त्यांना मंदिराच्या दरवाजातून मुखदर्शन व कळस दर्शन घेऊन माघारी परतावे लागले.

आज जोतिबा मंदिर सुरू होणार ही आशा अनेक भाविकांना होती पण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला मंदिर सुरू ठेवण्याबाबत कोणताही आदेश आला नसल्यामुळे आज मंदिर बंद ठेवण्याची वेळ आली.

नित्य नियमा प्रमाणे आज मंदिरात पहाटे काकड आरती, पाद्यपूजा मुखमार्जन, अभिषेक महापूजा, धुपारती सोहळा हे विधी झाले. आज मंदिरात पुजाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणासही प्रवेश दिला गेला नाही. मंदिरात केवळ पुजारी ग्रामस्थ होते. जोतिबा चैत्र यात्रेसंदर्भात बुधवारी प्रांताधिकारी तहसीलदार पोलीस उपअधिक्षक यांच्या प्रमुख उपस्थीत ग्रामस्थ पुजारी, व्यापारी, दुकानदार, सासन काठीचालक यांची बैठक होणार आहे. या बैठकीत यात्रेचे चित्र स्पष्ठ होईल. दरम्यान, कालपासून  येथील पुजाऱ्यांनी जोतिबा मंदिरात कोरोना संसर्ग देशातून दूर जावा यासाठी साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, नेहमी गजबजणारा जोतिबाचा मंदिर परिसर काल पासून सूना सूना वाटत आहे. येणाऱ्या भाविकांना प्रशासनाच्या वतीने मंदिर व डोंगरावर गर्दी करू नये, आरोग्याची काळजी घ्यावी, ग्रामस्थांनी सर्वत्र स्वच्छता राखा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे .
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT