जोतिबा डोंगर काढला जिल्हाधिकाऱ्यांनी पिंजून  
कोल्हापूर

जोतिबा डोंगर काढला जिल्हाधिकाऱ्यांनी पिंजून

गैरसोयीबद्दल देवस्थानसह ग्रा.पं.ची कानउघाडणी

सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी रात्री साडेआठ ते मध्यरात्रीपर्यंत डोंगर चालत पिंजून काढला. त्यांनी परिसराची कसून तपासणी केली. गल्ली बोळांची पाहणी केली. अनेक ठिकाणी गैरसोयी दिसून आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत देवस्थान व ग्रामपंचायत प्रशासनाला खडसावले. ६ तारखेपूर्वी गैरसोयी दूर करण्याच्या सूचना दिल्या. बुधवारी जिल्हाधिकारी पुन्हा डोंगरावर येणार आहेत.

जोतिबा देवाचे दर्शन ऑनलाईन नोंदणी करून ७ ऑक्टोबरपासून घेता येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाविकांना दक्षिण दरवाजातून पूजेचे साहित्य न घेता प्रवेश दिला जाणार आहे व उत्तर दरवाजातून बाहेर सोडण्यात येणार आहे.

महादेव, चोपडाई, जोतिबा मंदिरात पावसामुळे होणारी गळती रोखण्यास उपाययोजना करून मंदिरातील रंगरंगोटी स्वच्छता याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दुकानदारांनी जास्त गर्दी होऊ देऊ नये, ज्यांच्या दारात गर्दी दिसेल त्यांच्यावर कारवाईचा इशारा प्रांताधिकारी अमित माळी यांनी दिला.

बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेडगे, देवस्थानचे सचिव शिवराज नायकवाडी, कोडोलीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश काशीद, सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजीराव सांगळे, महादेव दिंडे, शंकर दादर्णे पुजारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

मंदिराची स्वच्छता

नवरात्र उत्सवानिमित आज जोतिबा मंदिराची स्वच्छता केली. देवता कार्यात वापरले जाणारे सर्व साहित्य स्वच्छ केले. नंदी महादेव चोपडाई काळभैरव यमाई या मंदिरातही स्वच्छता मोहीम झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT