jotiba yatra canceled because of corona virus 
कोल्हापूर

जोतिबा चैत्र यात्रा भाविकाविनाच ; डोंगर पडला ओस....

निवास मोटे

जोतिबा डोंगर - दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस. डोंगरावर आज गगनाला भिडणाऱ्या, खांद्यावर डोलणाऱ्या रंगीबेरंगी सासनकाठया कोठेही दिसत नाहीत. हलगी, पिपाणी, ढोल - तासे, सनई या वाद्यांचा आवाज कोठून ही येत नाही. गुलालाने माखलेले भाविक दिसत नाहीत. चांगभलचा जयघोष ऐकू येत नाही. आजच्या यात्रेच्या मुख्य दिवशी आख्खा डोंगर पूर्णपणे शांतच आहे. याचे कारण म्हणजे  कोरोना व्हायरसचे थैमान आणि या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतला लॉकडाऊन चा निर्णय होय. जोतिबा डोंगरावर कालपासून तीन दिवस कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून डोंगराकडे येणाऱ्या कुशीरे पोहाळे,  गिरोली, दाणेवाडी या भागातील वाटाही पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. 

कालपासून डोंगरावर सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान , आज पहाटे पाच वाजता मुख्य मंदिरात शासकीय अभिषेक झाला. पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते हा अभिषेक झाला. यावेळी उपसरपंच शिवाजीराव सांगळे, देवस्थान समितीचे अधीक्षक महादेव दिंडे, व काही मोजकेच पुजारी उपस्थित होते. सकाळी आठ वाजता राजेशाही थाटातील आकर्षक महापूजा बांधण्यात आली. ही पूजा दहा गावकर व पुजाऱ्यांनी बांधली. यंदा चैत्र यात्रेचा सोहळा १२१ वर्षानंतर भाविकांवीना  होत आहे. या पूर्वी १८९९ मध्ये प्लेगच्या साथीमुळे डोंगरावर चैत्र यात्रा झाली नव्हती. यंदा या यात्रेत भाविकांना येण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे डोंगर आज ओस वाटत आहे.डोंगरावर चिट पाखरू ही दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT