कोल्हापूर

जोतिबाच्या चरणी असणारा केखले गावचा 'दवणा' यंदाही कोरोनामुळे वाळतच

निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : जोतिबा डोंगराच्या (jotiba temple kolhapur) पायथ्याशी वसलेले केखले हे पन्हाळा तालुक्यातील (panhala) गाव. याचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात दवणा शेती केली जाते. भाविक लोक जसे गणपतीला दुर्वा वाहतात, महादेवाला बेल वाहतात तसेच दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाला दवणा अर्पण करण्याची पारंपरिक पध्दत आहे. हा हिरवागार फुले आलेला दवणा कोरोनामुळे (covid -19) गेल्या वर्षी ही वाळून गेला. यंदाही तो शेतात वाळत आहे. मंदीरासहीत डोंगराकडे येणारे सर्व रस्ते पूर्णपणे बंद असल्याने दवणा शेतकरी उत्पादक संकटात सापडले आहेत.

गुलाल-खोबऱ्या बरोबर मंदिरात दवणा वाहण्याची पारंपरिक पद्धत आहे. एकवेळ फुलांचा हार नसला तरी चालते, पण चिमुटभर गुलाल आणि दवण्याच्या दोन काड्या भक्तांकडून अर्पण केल्या जातात. फुलावर आलेल्या दवण्याचा सुगंध तर अवर्णनीय असतो. त्याचं शास्त्रीय नाव आर्टी मिसीया, सिवार्सियाना असं आहे. ही वनस्पती मुळची काश्मीरची पण दवण्याची दुसरी जात जंगलात उगवते. तिला वन्य दमन असेही म्हणतात. या केखले गावात ९० टक्के लोक दवण्याची शेती करतात. दवण्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे.

दवण्याची लागवड कधी

जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेसाठी विक्रीसाठी लागणाऱ्या दवणा पिकाची लागवड ही मकर संक्रांतीच्या वेळी करावी लागते. जोतिबाच्या खेट्याच्या वेळी विक्री करण्यासाठी लागणाऱ्या दवण्याची लागवड ही कार्तिक पौर्णिमेदरम्यान केली जाते.

दवणा विक्री कशी केली जाते

केखलेच्या दवण्याची विक्री सर्रास ज्योतिबा डोंगरावर केली जाते. दवण्याच्या मुठभर लहान पेंढ्यांची १० ते २० रुपयेप्रमाणे विक्री होते. नाईकबा (ता. पाटण) या ठिकाणी दवणा किरकोळ विक्रीसाठी पाठवला जातो.

दवण्याची लागवड कशी केली जाते

दवणा पिकासाठी प्रथम शेत नांगरून त्यात वाफे केले जातात. त्यामध्ये दवण्याचे तरू तयार केले जाते. ती रोपे सर्व शेतात लावली जातात. सुरूवातीला दिवसाआड पाणी दिले जाते. त्यानंतर दहा पंधरा दिवसाला पाणी दिले जाते. तीन महिन्यात दवणा पक्व होऊन फुले येतात.

"या परिसरात केवळ आमच्या गावात दवणा पिकतो. दवण्याचे नाव म्हणून गावची ओळख आहे. आमच्या गावाच बरेत शेतकरी हे पिक घेतो. कोरोनामुळे सर्व बंद आहे. मंदिर परिसरही बंद आहे. मात्र यावेळी शेतातील दवणा शिवारात वाळत आहे. या दवण्याचे काय करायचे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे."

- हिंदुराव पाटील. (दवणा उत्पादक, शेतकरी केखले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT