जोतिबा मंदिर परिसरातील तीन दरवाजे भाविकांसाठी खुले  sakal
कोल्हापूर

जोतिबा मंदिर परिसरातील तीन दरवाजे भाविकांसाठी खुले

सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर : जोतिबा डोंगरावरील जोतिबा मंदिर परिसरातील तीन दरवाजे भाविकांसाठी खुले केले. यामुळे भाविक, ग्रामस्थ, पुजाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. नवरात्रोत्सवापासून जिल्हा प्रशासनाने डोंगरावर ई-पास दर्शन पद्धत सुरू केली होती. यामुळे ६० टक्के भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला नाही. या पद्धतीवर नाराजी होती.

मंदिर परिसरातील पारंपरिक दर्शन रांगा सुरू करा तसेच मंदिर परिसरातील सर्व दरवाजे खुले करा अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली होती. याबाबत बैठक झाली. त्यात जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी मागणी मान्य करून दरवाजे खुले करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार दक्षिण, पश्चिम, उत्तर दरवाजे उघडले.

भाविकांना, पुजाऱ्यांना पश्चिम दरवाजातून मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. तर दक्षिण व उत्तर दरवाजातून बाहेर पडता येणार आहे. दरवाजे खुले करताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अधीक्षक महादेव दिंडे, ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे, संतोष शिंगे, ग्रामस्थ, पुजारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: जगात पुन्हा युद्धाची चाहूल? अमेरिकेवर विश्वास नाही; युद्ध भडकू शकतं, इराणचा कडक इशारा, चिंता वाढली!

Multibagger Stock: लखपतींचे करोडपती बनवणारा स्टॉक! फक्त ₹1 लाखाचे झाले तब्बल ₹1.30 कोटी

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

Junnar 12th Result: जुन्नर तालुक्यात बारावीचा निकाल ९१.४९ टक्क्यांवर; मुलींची बाजी, सात कनिष्ठ महाविद्यालये शंभर टक्के

SCROLL FOR NEXT