Jyotibas darshan will also be available on the LED screen 
कोल्हापूर

जोतिबाचे दर्शनही मिळणार आता एलईडी स्क्रीनवर

निवास मोटे

जोतिबा डोंगर - येथील श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिराची आज नवरात्र उत्सवानिमित्त स्वच्छता केली. ग्रामस्थ पुजारी, देव सेवक देवस्थान समितीचे कर्मचारी, पुण्यातील भारत विकास ग्रुपचे कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. कोरोनामुळे मंदिरांच्या शिखरांची रंगरंगोटी केली नाही. शिखरांवर शेवाळ व वेलींचे साम्राज्य होते. ते तरुणांनी स्वच्छ केले. दरम्यान, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे नवरात्र उत्सवात एलईडी स्क्रीनवर दख्खनच्या राजाचे दर्शन घेण्याची सोय केली जाणरा आहे. 

काल सकाळी मुख्य मंदिरातील देवता कार्यात वापरल्या जाणाऱ्या साहित्याची स्वच्छता केली. नंदी बद्रिकेदार, महादेव, चोपडाई, काळभैरव, यमाई मंदिरातही स्वच्छता मोहीम राबविली. यंदा नवरात्र काळात देवस्थान समितीने एलईडीद्वारे डोंगरावर ठिकठिकाणी दर्शनाची सोय करणार असल्याचे सांगितले.

नंदी बद्रिकेदार महादेव, चोपडाई काळभैरव, आदिनाथ यमाई मंदिर या मंदिरातही स्वच्छता मोहीम पूर्ण करण्यात आली. दुपारपर्यंत  या स्वच्छता मोहिमेचे काम सुरू होते. यंदा कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे मंदिर गेल्या आठ महिन्यापासून बंद असून भाविकांना दर्शन घेता आलेले नाही. नवरात्र काळात  तरी मंदिर खुले होतील. या आशेवर भाविक आहेत. परंतु अजूनही मंदिर बंदचा आदेश असल्यामुळे भाविक डोंगरावर येऊ शकत नाहीत. कोल्हापूर परिसरातून येणाऱ्या भाविकांना मात्र केवळ कळस दर्शनावर समाधान मानावे लागत आहे. यंदा नवरात्र काळात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने एलईडी द्वारे डोंगरावर ठिकाणी दर्शनाची सोय करणार असल्याचे सांगितले . येथे शनिवारपासून डोंगरावर नवरात्रोत्सव सुरू होत असून ग्रामस्थ पुजारी  वर्ग कामात गुंतला आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

Rishi Panchami 2026: ऋषी पंचमी महिलांसाठी खास का असते? १०८ वेळा आघाड्याच्या काडीने दात घासण्यामागचं कारण काय?

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

SCROLL FOR NEXT