k p patil vehicle story by sandeep khandekar
k p patil vehicle story by sandeep khandekar 
कोल्हापूर

के.पीं.चा झेन व क्वालीसचा ४४७७ नंबर गावागावांत फेमस

संदीप खांडेकर

 कोल्हापूर : कृष्णराव परशराम तथा के. पी. पाटील शेतकरी कुटुंबातले. ते मुरगूड विद्यालयाचे विद्यार्थी. दहावीतून उत्तीर्ण झाल्यावर त्यांचा दाखला राजाराम महाविद्यालयात जोडला गेला. कला शाखेची त्यांनी पदवी मिळवली. वयाच्या २१ व्या वर्षी ते राजकारणात आले. युवक काँग्रेसचे ते कार्यकर्ते. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी घरात जीप खरेदी झाली. तिचा नंबर ४४७७ होता. या गाडीतून त्यांनी जनसंपर्क वाढवला. त्याचा लोकांत चांगला प्रभाव पडला. हाच नंबर त्यांच्या हृदयात बसला. घरात येणाऱ्या नव्या गाड्यांसाठी तो आजही घेतला जातोय. या नंबरची केमिस्ट्री काही खास असल्याची त्यांची भावना आहे.
 

आऊताई व परशराम पाटील शेतकरी वर्गातले. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून के. पी. दहावी उत्तीर्ण झाले. राजाराम महाविद्यालयात त्यांच्या नेतृत्वाला आकार आला. राजकारणात कमी वयातच त्यांचा प्रवेश झाला. जनसंपर्काशिवाय राजकारण नाही, हे त्यांनी जाणले होते. गावोगाव धुंडाळण्यासाठी गाडी आवश्‍यक होती. त्यांच्या घरात १९९२ मध्ये चारचाकीचे आगमन झाले. गाडीतून कित्येक किलोमीटरचा प्रवास त्यांचा सुरू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर ग्रामीण अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक झाले. हा प्रवास चेअरमनपदापर्यंत पोचला. त्यांनी २००४ मध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. विजयाचा गुलाल त्यांनी अनुभवला. तत्पूर्वी घेतलेल्या झेन व क्वालीसचा त्यांचा नंबर मतदारांत फेमस झाला होता.

या नंबरची जादू २००९ च्या निवडणुकीत पुन्हा दिसली. दुसऱ्यांदा नेतृत्वाची धुरा त्यांच्याकडे मतदारांनी दिली. हुतात्मा वारके सहकारी सूतगिरणी, बाळूमामा शिक्षण प्रसारक मंडळ व दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या व्यवस्थापनात मात्र त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास, यावर त्यांचा कटाक्ष राहिला. राजकारणातील चढ-उताराचा अनुभव त्यांनी घेतलाय. जनतेशी जोडली गेलेली नाळ अबाधित राहावी, यासाठी ते आजही कार्यरत आहेत. वयाची सत्तरी त्यांनी ओलांडली आहे. चार दशकांहून अधिक त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यांचा मुलगा रणजितसिंह पाटील यांची वाटचाल त्यांच्याच पावलावर आहे. जिल्हा बॅंकेचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या जनसंपर्कासाठी घरात किंवा इनोव्हा क्रिस्टल आहे. गाडीचा नंबर ४४७७ असाच घेतलाय. पाटील कुटुंबीयांनी शेतीशी असलेली नाळ आजही कायम ठेवली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकावा, यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या गाड्या गावा-गावात परिचयाच्या झाल्या आहेत. गाड्यांचा नंबर मतदारांत आकर्षणाचा विषय झालाय. काही कार्यकर्ते त्यांच्या गाड्यांसाठी या नंबरचाच आग्रह धरतात.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT