In Kabunur, The Initiative Of Women Members Was To Remove The Garbage Box Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

कबनूरमध्ये महिला सदस्यांच्या पुढाकाराने हटला कचरा कोंडाळा

रवींद्र पाटील

कबनूर : येथील साखर कारखाना रस्त्यावरील सनी कॉर्नर परिसरात एका रिकाम्या जागी गेली दहा-पंधरा वर्षे परिसरातील लोक कचरा टाकत असल्याने त्या जागेला कचरा कोंडाळ्याचे रूप आले होते. मात्र या वॉर्डातील दोन महिला सदस्यांनी पुढाकार घेऊन स्वच्छता करून तेथे बाकडी टाकून व झाडे लावून, पाणपोईचे नियोजन केले. त्यामुळे या परिसराचे रूप पालटले असून ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. 

कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे या परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्‍यात आले होते. याबाबत वारंवार ग्रामपंचायतकडे तक्रार करुनही कार्यवाही झालेली नव्हती. ग्रामपंचायतने तेथील कचरा नेऊन जागा स्वच्छ केली तरी लोक तेथे कचरा आणून टाकत असल्याने हा प्रश्‍न गंभीर झाला होता. 

हा परिसर वॉर्ड क्रमांक चार मध्ये येतो. या वॉर्डाच्या नूतन ग्रामपंचायत सदस्या वैशाली अशोक कदम व अर्चना सुधीर पाटील यांनी या प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून तेथील कचरा उठाव करून तेथे मुरूम टाकून जागा व्यवस्थित करून घेतली. महिला दिनाचे औचित्य साधून तेथे झाडे लावली. लोकांना बसण्यासाठी दोन बाकडी ठेवली. पाणपोई करण्याचे नियोजन आहे. नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या या कामाबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. 

चांगले परिवर्तन झाले
ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या या प्रयत्नामुळे स्वच्छता निर्माण झाली. लोक दररोज सकाळी येणाऱ्या घंटागाडीमध्येच कचरा टाकतात. चांगले परिवर्तन झाले आहे. 
- विवेक रामगोंडा पर्वते, नागरिक 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Chemical Factory Blast : साताऱ्यात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, १० किलोमीटरपर्यंत परिसर हादरला

बापरे! शुटिंगनंतर समुद्रात गेला अन्...! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, अभिनेत्रीसमोरच घडली धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीला २ एप्रिल पर्यंत यलो अलर्ट

White Squirrel Kolhapur : नेहमीची खार विसरा, ही आहे खास! कोल्हापुरात आढळली चक्क पांढरी शुभ्र खारुताई; काय आहे यामागचं रहस्य?

IPL 2026: बंगळूर संघाविरुद्ध सुमार गोलंदाजीचा फटका; सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांची निराशा

SCROLL FOR NEXT