Kagal will go to Gramsevak Training Center 
कोल्हापूर

ग्रामसेवक प्रशिक्षण  केंद्र जाणार कागलला 

सदानंद पाटील

कोल्हापूर  : राज्याची मुहूर्तमेढ रोवतानाच सुरू झालेल्या कोल्हापुरातील कसबा बावडा येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे स्थलांतर कागलमध्ये करण्याच्या हालचाली सुरू आहेत. गेली महिनाभर यासाठी युद्धपातळीवर बैठका सुरू आहेत. कधी नव्हे तो झटपट प्रस्ताव तयार करणे, आराखडा करणे, जागेचा शोध घेणे, निधी उपलब्ध करण्यासाठी यंत्रणा राबू लागली आहे. ही कामे तत्काळ व्हावी, यासाठी समितीचीही स्थापना केली आहे. 
ग्रामसेवकांची बहुतांश कामे ही कृषी विभागाशी निगडित आहेत. राज्यातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रे ही कृषी विभागाच्या अखत्यारित होती. कालांतराने 26 जुलै 1999 रोजीच्या शासन निर्णयानंतर कोल्हापुरातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र हे ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित केली. कृषी विभागाच्या जुन्या इमारतीत असलेले कार्यालय वारंवार स्थलांतर करण्याची मागणी होती. या केंद्राला लागूनच झूम प्रकल्प आहे. त्यामुळे प्रशिक्षण केंद्रात दुर्गंधी येते. ही इमारत जुनी आहे. पावसाळ्यात या प्रशिक्षण केंद्रात गळती लागते. 
अनेक असुविधांमुळे प्रशिक्षण केंद्रासाठी शहरात जागा शोधण्याचे काम सुरू होते. मात्र, आता हे केंद्र कागलला नेण्याचे नियोजन केले आहे. 
ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र ही एक स्वायत्त संस्था आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली स्थलांतराचे नियोजन सुरू आहे. या इमारतीसाठी शहरात विविध जागांचा शोध घेतला. जिल्हा परिषदेची जागा ही यासाठी कमी पडत आहे. त्यामुळेच कागल येथे जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात या प्रशिक्षण केंद्रासाठीची जागा निश्‍चित केली आहे. ही जागा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी, कागल तहसीलदार, बीडीओ तसेच मंत्रालयाशी संपर्क साधण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. 

ग्रामसेवक प्रशिक्षक केंद्र हे सध्या कृषी विभागाच्या इमारतीत आहे. ही जागा अपुरी आहे. इमारतही जुनी आहे. शेजारी झूम प्रकल्प असल्याने अनेक अडचणी आहेत. या प्रशिक्षण केंद्रासाठी स्वमालकीची इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी कागल येथील जमीन घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यानंतर प्रशासकीय मान्यता घेतली जाईल. 
- अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी. 

केंद्राचे असे चालते कामकाज 
हे प्रशिक्षण केंद्र सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासाठी आहे. तिन्ही जिल्ह्यांतील ग्रामसेवकांना प्रशिक्षण, त्यांची 10 वर्षांतून उजळणी, शासनाच्या विविध योजनांची प्रशिक्षणे घेण्याची जबाबदारीही या केंद्रावर आहे. यशदा या संस्थेप्रमाणेच प्रशिक्षण केंद्राचे कामकाज चालते. एक प्राचार्य, वर्ग एकचे पाच व्याख्याते, तीन क्‍लार्क, दोन ट्रेनिंग इन्ट्रक्‍टर, चार शिपाई एवढा कर्मचारी वर्ग या केंद्राकडे आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी भारतात आला होता कसाब? उज्ज्वल निकमांचा धक्कादायक दावा, म्हणाले...

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरे दुष्काळ दौरा भेटीसाठी परभणी दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT