kajal Ghodeshwar yatra cancel 
कोल्हापूर

दोन राज्यांचे भक्तीस्थान असलेल्या 'घोडेश्वर'ची यात्रा रद्द 

प्रकाश तिराळे

मुरगूड : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कुरुकली (ता.कागल) येथील 'घोडेश्वर'ची यात्रा रद्द करुन धार्मिक कार्यक्रम व उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

कागल तालुक्यातील कुरुकली येथील घोडेश्वरची यात्रा प्रतिवर्षी घटस्थापनेपासून सुरू होते. यावर्षी शनिवारी (ता.17 ) घटस्थापना असून बुधवार पासून पालखी प्रदक्षणा निघते. शुक्रवारी (ता.२३) रात्री निघणारी 'श्री' ची उत्सव मुर्ती  केवळ सात लोकांच्या उपस्थितीत मंदिरात नेहली जाणार असून यावेळी भाविकांना दर्शन घेता येणार नाही. तर शनिवारी (ता.२४) होणारे भव्य कुस्तीचे मैदानही रद्द करण्यात आले आहे. यात्रेचा मुख्य दिवस रविवारी (ता.२५) असून यादिवशी होणारा पालखी सोहळा ही केवळ कुरुकली, सुरुपली आणि बेनिक्रे या गावातील मानकरी, पोलिस पाटील व पुजारी अशा सात लोकांच्या उपस्थित होणार आहे. तसेच मंदिर परिसरात खेळाची, मिठाईची दुकाने यांना प्रवेश बंदी असणार आहे. 

यावर्षी कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर ही यात्राच रद्द करण्याचा निर्णय आज घोडेश्वर देवालय येथे झालेल्या तीन गावच्या प्रमुखांच्या बैठकीत घेण्यात आला.

शनिवारी ता.(१७) पासून मंदिर परिसरात जाणारे कुरुकली, सुरुपली व बेनिक्रे येथील सर्व मार्ग बँरिकेट लावून बंद केले जाणार असून या ठिकाणी पोलिस बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे. 

मुरगूड पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या जाधव यांनी या बैठकीत कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची गर्दी करता येणार नाही. धार्मिक कार्यक्रम साध्या पध्दतीने करावेत. यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या. माजी सरपंच आर. व्ही. पाटील, बी. आर. पाटील, मारुती काळूगडे, सुनील कांबळे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. स्वागत प्रास्ताविक विकास पाटील यांनी केले आभार पुजारी सुनील कांबळे यांनी मानले. यावेळी प्रशासक सुरेश कुंभार, माजी सरपंच एस.डी.कांबळे, सुरुपलीचे सरपंच अनिल कांबळे, ग्रामसेवक प्रविण पाटील,आर.के. पाटील, भास्कर पाटील, जयवंत पाटील,पोलीस पाटील सतिश तिराळे, शिवाजी कुंभार,निलेश पाटील आदी उपस्थित होते.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT