कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील अतिसुरक्षा विभागाजवळ मिळालेल्या मोबाईलसह चार बॅटऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. तो मोबाईल कारागृहात कधीपासून होता व तो तेथे कोणी नेला, याबाबत तपास केला जात आहे. दोघे संशयित ज्या मोटारीतून पसार झाले, त्या मोटारीच्या शोधासाठी किणी टोलनाक्यावरील फुटेजवर भर आहे.
कळंबा कारागृहात आणखी एक मोबाईल व चार बॅटऱ्या मिळून आल्या. हा मोबाईल कारागृहात कसा पोचला? यामागे कोणत्या बंदीसह अन्य कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, १० मोबाईल फेकणाऱ्या दोघा संशयितांचा शोध पथकाकडून सुरू आहे. त्या संशयितांची पांढऱ्या रंगाची मोटार किणी टोलनाक्यापर्यंत पोचल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे येत आहे. त्यामुळे या मार्गावरील २७ ठिकाणचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची तपासणी सुरू आहे.
तो शाब्दिक वादच...
कारागृहात शुक्रवारी बंदी व सुरक्षारक्षकात फक्त शाब्दिक वाद झाला होता. कोणत्याही प्रकारच्या मारामारीचा प्रकार घडला नव्हता, असे अधीक्षक इंदूरकर यांनी सांगितले.
इचलकरंजीत संशयितांची चौकशी
कळंबा कारागृहामध्ये मोबाईल, गांजा व इतर साहित्य टाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याचे कनेक्शन इचलकरंजी असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी आजही संशयितांच्या चौकशीचे काम सुरूच ठेवले आहे. पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी व त्यांच्या पथकाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह काही संशयितांकडे आज दिवसभर कसून चौकशी करण्यात आली.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.