kalamba jail to find a drugs and 10 mobile from unknown two people in kolhapur today 
कोल्हापूर

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात फेकला गांजासह 10 मोबाईल

राजेश मोरे

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात पाऊण किलो गांजासह 10 मोबाईल संच, दोन पेन ड्राईव्ह असलेले तीन पॅकेट असा 15 हजाराहून अधिकचा मुद्देमाल मिळून आला. दीड महिन्यात दुसऱ्यांदा घडलेल्या प्रकारामुळे कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले. मोटारीतून आलेल्या दोघांनी हे पॅकेट मंगळवारी मध्यरात्री कारागृहात फेकल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात त्या दोघा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, मंगळवारी (ता.22) मध्यरात्री दीडच्या सुमारास गारगोटीच्या दिशेने एक आलिशान मोटार जात होती. ती कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या तट क्रमांक एक समोरील रस्त्यावर थांबली. त्यातून दोघेजण बाहेर आले. त्यांनी येथील महावितरणच्या डीपी जवळील फूटपाथवरून कपड्याचे तीन पुडके कारागृहाच्या संरक्षक भिंतीवरून आत फेकले. हा प्रकार कारागृहातील सुरक्षारक्षकांच्या लक्षात आला. त्यांनी कारागृहाची तपासणी केली. त्यावेळी त्यांना फाटक्‍या कपड्यात गुंडाळलेले तीन पुडके मिळून आले. याची माहिती त्यांनी कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर त्यांनी ती पुडकी खोलली. त्यात पाऊण किलो गांजा, दहा मोबाईल संचसह पेन ड्राईव्ह असा 15 हजाराहून अधिक किमंतीच्या वस्तू मिळून आल्या. याबाबत कारागृह प्रशासनातर्फे कर्मचारी रवींद्र भाट यांनी याबाबतची फिर्याद दिली. त्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

दीड एक महिन्यापूर्वी चेंडू कापून त्यात गांजा भरून ते कारागृहात फेकण्याचा प्रयत्न झाला होता. त्या तिघांवर जुना राजवाडा पोलिसांनी कारवाई केली होती. दरम्यान काल घडलेल्या या प्रकारामुळे कारागृह प्रशासनाकडून संपूर्ण कारागृहाची तपासणी करण्यात आली. 

गांजा, मोबाईल फाटक्‍या कपड्यात

जुन्या फाटक्‍या कपड्याचे तीन वेगवेगळे पुडके तयार करून त्यात 750 ग्रॅम गांजा, 10 मोबाईल, 2 पेन ड्राईव्ह, 4 चार्जर कॉड गुंडाळले होते. त्यावर चिकटपट्टया लावून त्या घट्ट सील केल्या होत्या. जेणे करून रस्त्यावरून फेकल्यानंतर ही पुडकी कारागृहाची भिंत भेदू शकेल आणि अपेक्षित ठिकाणी पडू शकतील याबाबत दोघा संशयितांनी खबरदारी घेतली असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लक्ष्मण बांदल; शशिकांत शिंदेंच्या हस्ते नियुक्तीपत्र

Latest Marathi News Update : पुण्यात बी. जे. मेडिकल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु

Bangladesh Onion Export : कांद्याच्या बाजारात नवा खेळाडू, श्रीलंकेसाठी बांगलादेशाची निर्यात तयारी; भारतीय कांद्यासमोर नवे आव्हान

SCROLL FOR NEXT