kalamba jail kolhapur Cannabis use for mobile delivery second type revealed in a month and a half 
कोल्हापूर

चेंडूच्या ‘थ्रो’ने कळंबा कारागृहात थेट गांजा व मोबाईल: दीड महिन्यात दुसरा प्रकार

राजेश मोरे

कोल्हापूर : चेंडूच्या ‘थ्रो’ने कळंबा कारागृहात थेट गांजा व मोबाईल पोहचविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा घडला. यातून कारागृहाची सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली आहे. 

कळंबा मध्यवर्ती कारागृह गेल्या काही वर्षांपासून वेगवगेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. यापूर्वी कैद्यांच्या पार्टीचा आणि संशयित डॉक्‍टरचा व्हायरल झालेला व्हिडिओ हे सर्वात चर्चेचा विषय बनले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांसह सुरक्षा व्यवस्थेत प्रशासनाने वाढ केली होती. दरम्यान, कैद्यांचा गळाभेटीसह विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून कारागृहाची प्रतिमा उंचविण्याचा यशस्वी प्रयत्नही करण्यात आला; मात्र गेल्या दीड महिन्यात घडलेल्या प्रकारामुळे कारागृहाची सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. कारागृहात बाहेरून फेकण्यात आलेल्या गांजासह १० मोबाईलमुळे सारेच चक्रावून गेले. 


कळंबा कारागृहाच्या परिसरातून तिघा संशयितांना जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या तिघांनी चेंडू कापून त्यात गांजा भरला होता. ते तिघे हे चेंडू कारागृहात फेकण्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडून गांजा भरलेले चेंडू पोलिसांनी जप्त केले होते. त्यातील दोघे पुण्याचे, तर एक कोल्हापूरचा होता. हा प्रकार थंड होतो न होतो तोच मंगळवारी (ता.२२) मध्यरात्री आलिशान मोटारीतून आलेल्या दोघा संशयितांनी अशाच पद्धतीने गांजासह १० मोबाईल संच असलेले कापडाचे तीन पुडके कारागृहात फेकले. कारागृहात कडक सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्हीचे जाळे असताना घडलेल्या दुसऱ्या प्रकाराने प्रशासनही खडबडून जागे झाले.

संशयितांनी कारागृहात हे मोबाईल, गांजा, चार्जर कॉड, पेन ड्राईव्ह कोणत्या कैद्यांसाठी फेकले होते, त्याचा कोणता कैदी कसा वापर करणार होता, त्यामागे अन्य कोणाचा हात आहे का, असे विविध प्रश्‍नांचा शोध घेण्याचे आव्हान आता कारागृह प्रशासनासमोर आहे. तसेच ‘थ्रो’चे असे प्रकार पुन्हा घडू नयेत त्यासाठी सुरक्षेबाबत आवश्‍यक त्या उपाययोजना तातडीने करण्याची जबाबदारीही पेलावी लागणार आहे. 

दृष्टिक्षेपात 
  दीड महिन्यातील कारागृहातील घडलेले प्रकार
  चेंडूतून कारागृहात गांजा पोहचविण्याचा तिघांचा प्रयत्न
  कारागृहातील बंदीचा मृत्यूप्रकरणी दोघा कैद्यांवर गुन्हा 
  कापडी पुडक्‍यातून फेकले गांजासह १० मोबाईल

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

Beed False Cases Claim : बीडमध्ये सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात अपर अधीक्षकांचा खळबळजनक दावा; पोलिस दलाला घरचा आहेर

Maharashtra Ganesh Visarjan Live: तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

SCROLL FOR NEXT