kalamba jail superintendent sharad shelke immediately transfer to yerwada jail from kolhapur today 
कोल्हापूर

ब्रेकिंग ; कळंबा कारागृहाच्या अधीक्षकांची तडकाफडकी बदली

राजेश मोरे

कोल्हापूर : कळंबा कारागृहात फेकलेले 10 मोबाईल व गांजा प्रकरणी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांची तडकाफडकी येरवडा कारागृहाला बदली करण्यात आली. त्यांचा पद्‌भार पुणे येरवडा येथील सी. एच. इंदुलकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिले. याप्रकरणाच्या चौकशीसाठी खुद्द रामानंद हे आज कोल्हापुरात दाखल झाले. 

दीड महिन्यापूर्वी तिघा संशयितांनी चेंडू कापून त्यात गांजा भरला होता. ते तीन चेंडू ते कळंबा मध्यवर्ती कारागृहात फेकण्याच्या तयारीत होते. त्यापूर्वीच जुना राजवाडा पोलिसांनी त्या तिघांवर कारवाई केली. दरम्यान, कळंबा मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी मध्यरात्री मोटारीतून आलेल्या दोघा अज्ञातांनी कपड्याची तीन पुडकी फेकली. त्यात पाऊण किलो गांजा, 10 मोबाईल, दोन पेन ड्राईव्ह, चार चार्जर कॉड आणि चिकटविण्यासाठी वापरण्यात येणारे मिश्रण होते. एकाच वेळी कळंबा कारागृहात दहा नवे मोबाईल पोहचविण्याचा झालेल्या प्रयत्नांची गंभीर दखल कारागृह प्रशासनाने घेतली. 

संपूर्ण कारागृहाची तपासणी करून याच्या मुळापर्यंत जाऊन तपास करण्याचे आदेशही वरिष्ठ पातळीवर प्रशासनाला देण्यात आले. या प्रकरणाची चौकशीसाठी खुद्द अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद हे आज सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. त्यापूर्वी एकापाठोपाठ घडलेल्या प्रकारामुळे त्यांनी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांची या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत पुणे येरवडा कारागृहात बदली करण्यात आली. त्यांच्याजागी पुणे येरवड्याचे सी. एच. इंदुलकर यांच्याकडे कारागृहाची सुत्रे देण्यात आली असल्याचे रामानंद यांनी सांगितले. याप्रकरणी काही बंदीसह कारागृहातील कर्मचारी अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

संपादन - स्नेहल  कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT