Kalamba prison administration emphasizes on security; challenge to find 'charger' behind mobile screen 
कोल्हापूर

कळंबा कारागृह प्रशासनाचा सुरक्षेवर भर ;मोबाईलच्या पडद्यामागचा "चार्जर' शोधण्याचे आव्हान 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात 15 दिवसात एक दोन नव्हे तर 13 मोबाईल सापडले. कारागृहात हे मोबाईल पोहचले कसे?, त्याचा कसा वापर केला जाणार होता, हे शोधण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे. दरम्यान, सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून सीसीटीव्हीची संख्या वाढविण्याचा हलचालीसह पाहऱ्यासाठी श्‍वानाचीही मदत घेतली जात आहे. 

कळंबा कारागृहात आठ ते दहा दिवसांपूर्वी मोटारीतून आलेल्या दोघा अज्ञातांनी कपड्याचे तीन पुडके कारागृहात फेकले. त्यात 10 मोबाईल, गांजा, पेन ड्राईव्ह, चार्जर कॉडसह व्हीसील सापडल्याने कारागृहाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. यानंतर अधीक्षक शरद शेळके यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या पद्‌भार चंद्रमणी इंदूरकर यांच्याकडे सोपविला. त्यांनी तातडीने कारागृहाची तपासणी केली. त्यात एक मोबाईल संचसह चार बॅटऱ्या मिळून आल्या. यानंतर पुन्हा इंदरकर यांनी घेतलेल्या झडतीत झाड्याच्या बुंध्यात बिस्किटाच्या मोकळ्या पाकिटात एक मोबाईलसह तीन बॅटऱ्या मिळून आल्या. कारागृहाला लागलेला या "मोबाईलचा व्हायरस' नष्ट करून त्यामागे कोणाचा "चार्जर' आहे? हे शोधण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. दरम्यान इचलकरंजी पोलिसांना याबाबतचे धागेदोरे हाती लागले आहेत. 

68 सीसीटीव्हींचे सुरक्षा कवच 
कारागृहाच्या बाहेरील व आतील भागात 32 व 36 अशा एकूण 68 सीसीटीव्ही बसविण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार आहे. हा प्रस्ताव सुमारे 50 लाखांचा आहे. तो जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीसाठी पाठविल्याचे अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangare Patil Kunbi Certificate : विश्वास नांगरे -पाटील यांनी कुणबी दाखल्याचा वापर केला? अंतरवालीत ओबीसी आंदोलनात दावा; वातावरण तापलं

९ वर्षांच्या एकटेपणानंतर अपूर्वा नेमळेकरांनी सांगितली मनातली गोष्ट; दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाली...

Yoga For Everyone: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांसाठी 'ही' आहेत सर्वोत्तम योगासने! आरोग्य अन् मानसिक शांतीची पक्की गॅरंटी...

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

SCROLL FOR NEXT