Kalbhairav ​​Palkhi Ceremony In The Presence Of Dignitaries Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

मानकऱ्यांच्या उपस्थितीत काळभैरव पालखी सोहळा

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या येथील ग्रामदैवत श्री काळभैरवाची पालखी आज सायंकाळी यात्रास्थळाकडे रवाना झाली. कोरोनामुळे दरवर्षीचा पालखी सोहळा रद्द करून केवळ मोजक्‍या मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी गाडीतून नेण्यात आली. भाविकांना बंदी असली तरी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मंदिराला नागरीकांनी गराडा घातला होता. आज (ता.28) मध्यरात्री शासकीय पुजा होईल. यात्रास्थळी जाण्यासाठी भाविकांना बंदी असून मंदिराभोवती एक किलोमीटर अंतरावर लाकडी अडथळे उभारले आहेत. पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त आहे. 

कोरोनामुळे काळभैरीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. इतिहासात प्रथमच असा निर्णय घेतला आहे. केवळ मोजके मानकरी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत पारंपरिक धार्मिक विधी करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आज दुपारी येथील शिवाजी चौकातील काळभैरी मंदिरात पुजा सुरू झाली. विठ्ठल गुरव यांनी मानकऱ्यांना धार्मिक विधी पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले. 

दुपारी सव्वातीनला तहसीलदार दिनेश पारगे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या उपस्थितीत आरती झाली. आरतीनंतर काळभैरी बाळभैरी भैरीच्या नावाने जयघोष झाला. या वेळी सुधीर पाटील, रमेश रिंगणे, उदय पाटील यांच्यासह ज्येष्ठ पंच, मानकरी उपस्थित होते. मंदिरालगत उभ्या असणाऱ्या टेम्पोतून पालखी यात्रास्थळाकडे रवाना झाली. यंदा सासनकाठ्यांना परवानगी नसल्याने काही भाविकांनी मंदिरात तर काहींनी पालखी नेणाऱ्या गाडीलाच गोंडे बांधले. 

दरम्यान, रात्री बाराला मानकरी, मंदिर उपसमितीचे सदस्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय पुजा होणार आहे. दर्शनासाठी मंदिर पाचमार्चपर्यंत बंद केले आहे. त्यामुळे मंदिरसभोवती असणाऱ्या एक किलोमीटर अंतरावर लाकडी अडथळ्यांनी परिसर बंदिस्थ केला आहे. काळभैरी मार्गे होणारी वाहतूकही वडरगे मार्गे वळविण्यात आली आहे. 

सकाळीच दर्शनासाठी गर्दी... 
दरवर्षी पालखी सोहळा हजारोंच्या उपस्थितीत होतो. यंदा यात्रा रद्द करुन सर्वच धार्मिक विधी मोजक्‍याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार असल्याने स्थानिक भाविकांनी मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यामुळे शिवाजी चौक परिसर भाविकांनी फुलून गेला होता. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT