Kalsubai Climb from three year old Anvi Ghatge kolhapur
Kalsubai Climb from three year old Anvi Ghatge kolhapur 
कोल्हापूर

तीन वर्षांच्या अन्वी घाटगेकडून ‘कळसुबाई’ सर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - दोन वर्षे अकरा महिन्यांच्या अन्वी चेतन घाटगे हिने ‘कळसुबाई’ शिखर मोहीम फत्ते केली. सव्वा तीन तासांत मोहीम पूर्ण करत तिने, महाराष्ट्रातील सर्वात उंच असणारे शिखर सर केले. शिखर सर करणारी ती देशातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे, असा दावा कोल्हापूर हायकर्सचे सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘पोलिस अंमलदार चेतन व अनिता घाटगे यांची ती मुलगी आहे. तिने दाट धुके, मुसळधार पावसात १६४६ मीटर उंचीच्या कळसूबाई शिखरावर चढाई केली. अहमदनगर जिल्ह्यातील बारी ग्रामपंचायतीतर्फे तिचा सन्मान केला. तिने यापूर्वी १८ महिन्यांची असताना पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम पूर्ण केली आहे. वेसरफ ते जंगल असा १३ किलोमीटरसह सादळे-मादळे डोंगर, गगनबावडा तालुक्यातील मोरजाई, बोरबेट डोंगर व पठाराची पदभ्रमंती केली आहे. गगनगिरी गडाच्या ५६० पायऱ्या सर केल्या आहेत. हातकणंगलेतील बाहुबली डोंगर व दाजीपूर शिवगडही सर केला.

ते म्हणाले, ‘‘घाटगे यांनी ट्रेकिंगसह पर्यावरण रक्षणासोबत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. अन्वीला तेजस स्वामी ट्रेक शयात्री गिर्यारोहण संस्था, मैत्रेय प्रतिष्ठान, कोल्हापूर हायकर्स, अॅडव्हेंचर गिअरतर्फे सन्मानित केले आहे. चेतन घाटगे व अनिता घाटगे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT