The Kardaga Bhoj dam is under water for the first time this year 
कोल्हापूर

कारदगा - भोज बंधारा यंदा पहिल्यांदाच पाण्याखाली...

सकाळवृत्तसेवा

मांगूर - अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या दुधगंगा पट्ट्यातील शेतकऱ्यांना पावसाने दिलासा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन कारदगा येथे दूधगंगा नदीवरील कारदगा-भोज बंधारा यंदा पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे.

उन्हाळ्यात पडलेल्या किरकोळ वळीव पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. शिवाय यंदा पहिल्यांदा १ जूनला पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतातील पेरणीची कामे उरकली होती. त्यानंतर आठवडाभर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता. १५ जूनपासून सलग तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून दूधगंगा दुथडी भरून वाहत आहे. बुधवारी (ता. १७) सकाळी कारदगा येथे दूधगंगा नदीवरील
कारदगा-भोज बंधारा पाण्याखाली गेल्याने कारदगा, भोज वाहतूक बेडकिहाळ, बोरगाव मार्गे सुरू आहे. दुधगंगा नदीवरून ओसंडून धबधब्याप्रमाणे वाहणारे पाणी पाहण्यासाठी कारदगा येथे दूधगंगा नदीकाठावर ग्रामस्थांची गर्दी होत आहे.

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

Mohol News : अठरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने वसतीगृहातच गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT