Karnataka border lakes become Ichalkaranji kolhapur marathi news 
कोल्हापूर

इचलकरंजीत झाल्या कर्नाटकाच्या सीमा लाॅक.....

पंडीत कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून इचलकरंजी शहरात कर्नाटकातून येणारी अत्यावश्यक वस्तूंसह सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पंचगंगा नदीवरील जूना पूल वाहतूकीसाटी पूर्णपूण बंद करण्यात आला आहे. तर या ठिकाणी असणार्‍या तपासणी नाक्यावर अधिक सतर्कता बाळण्यात आली असून तेथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत केली आहे.

इचलकरंजी शहरात कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात दुध व भाजीपाला येतो. लॉक डाऊनच्या काळातही या भागातून मोठी वर्दळ शहरात आहे. पण बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्यांने होत आहे. या जिल्ह्याशी इचलकरंजीचा दररोजचा संपर्क पाहता अधिक तातडीने प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

आज सांयकाळी पोलीस उप अधिक्षक गणेश बिरादार यांनी या मार्गावरील तपासणी नाक्यावर भेट देवून अधिक सतर्क राहण्याची सूचना तेथील कर्मचार्‍यांना केल्या आहेत. यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक गजेंद्र लोहार व नंदकुमार मोरे उपस्थीत होते.
पंचगंगा नदीवरील दोन्ही पूलावरून वाहतूक सुरु होती. जूना पूल वाहतूकीसाठी सांयकाळी बंद करण्यात आला. तर अत्यावश्यक वाहतूकीसाठी नवा पूल खुला राहणार आहे. मात्र कर्नाटकातून येणार्‍या सर्व वाहतूकीला आजपासून मनाई करण्यात आली. त्यामुळे भाजीपाला, दूध आदी अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक बंद राहणार आहेत. यामध्ये हयगय होवू नये, यासाठी तपासणी नाक्यावर सीसीटीव्हीचे नियंत्रण राहणार आहे.

सर्व चोरवाटा केल्या बंद
पंचगंगा नदीघाट परिसरातून शहरात येण्यासाठी मुख्य मार्ग वगळता अन्य एक - दोन चोरवाटा आहेत. यामार्गे शहरात चालत अथवा दुचाकीवरुन येणार्‍यांची संख्या जास्त आहे. ही वाहतूक रोखण्यासाठी पालिकेकडून विशेष यंत्रणा राबविण्यात आली असून या मार्गावर चर खोदण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT