कोल्हापूर

Karnataka Congress: लोकसभा निवडणुकीपूर्वी ॲक्सीटेंड होऊन काँग्रेस सरकार कोसळणार; भाजप नेत्याचा दावा

बसवराज यत्नाळ; सीएम पदावरून वाद चिघळण्याचा दावा

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव: काँग्रेस सरकार पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी ॲक्सीटेंड (अपघात) होऊन सरकार पडेल, असा दावा विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला.

बेळगाव येथील गांधी भवनमध्ये रविवारी भाजप कार्यकर्त्यांच्या सभेला उद्देशून ते बोलत होते. सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. तर दुसरीकडे डी. के. शिवकुमार शांत बसणार नाहीत.

गॅरंटी योजनांची इतिश्री झाली आहे. गॅरंटी योजनांची हमी देणे शक्य नाही. कोणतेही सरकार सत्तेत आले तरी त्यांना गॅरंटी योजना राबविता येणार नाहीत.

गॅरंटी योजनेमुळे कर्नाटकामध्ये अराजकता सुरू झाली आहे. या स्वरुपाच्या घोषणा बसवराज बोम्मई यांनाही जाहीर करता आल्या असत्या. मात्र, ज्या गोष्टींची कार्यवाही शक्य नाही, त्याची घोषणा न करणे योग्य आहे, असे यत्नाळ

यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून २८ पैकी २८ जागा या जिंकून देऊन परत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहाती देशाची सुत्रे द्यावी, असे आवाहन केले.

आमच्या पक्षात काही अतृप्त आत्मा आहेत. पक्षाच्याच उमेदवारांचा पराभव करण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, मतदार संघामध्ये न जाता निवडून आलो आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे, म्हणून घरामध्ये बसून कसे चालेल. आपण सर्वांनी मिळून आजपासून काम सुरु करून पक्षाला परत सत्तेत आणावे, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT