Karnataka government much discussed cabinet expansion by elections in Nagar and Shira assembly constituencies informed Chief Minister B. S. Yeddyurappa  
कोल्हापूर

येडियुराप्पा मंत्रिमंडळाचा होणार विस्तार ; चार मंत्र्यांना डच्यू ?

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : कर्नाटक सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार आर.आर. नगर आणि शिरा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीनंतर होईल, अशी माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी शुक्रवारी दिली. शिरा विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराला जाण्यापूर्वी आपल्या अधिकृत कावेरी निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.


मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यातील पोटनिवडणुकीनंतर मी दिल्लीला जाणार आहे. त्यादरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय अंतिम होईल. दिल्लीला कधी जायचे यावर निर्णय झाला नाही, परंतु पोटनिवडणुकीनंतर दिल्लीला जाऊन मंत्रिमंडळ विस्तारावर हायकमांडशी चर्चा करण्याची शक्‍यता असल्याचे ते म्हणाले. मागील महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार होता, परंतु पोटनिवडणूक जाहीर झाल्याने हा विषय मागे पडल्याचे त्यांनी सांगितले.


विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी येत्या १५-२० दिवसांत मुख्यमंत्री बदलला जाईल, अशा केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना येडियुराप्पा म्हणाले की, पोटनिवडणुकीनंतर धजद आणि काँग्रेसच्या नेतृत्वात बदल केले जातील, राज्यसरकारच्या नेतृत्वात नाही. प्रचाराच्या मुद्यावर ते म्हणाले, ‘‘माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांच्यासह विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी पोटनिवडणुकीत प्रचार केला. अशा परिस्थितीत पोटनिवडणुकीसाठी मी प्रचार केला नसता, तर ते चुकीचे झाले असते.

चार-पाच मंत्र्यांना वगळणार
सप्टेंबरमध्ये झालेल्या विधिमंडळ अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याची योजना होती. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिल्लीला जाऊन या संदर्भात पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चाही केली होती. परंतु भाजप हायकमांडने अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे सुचवून वेळ मारून नेली. त्यानंतर पोटनिवडणुक जाहीर झाली. मंत्रिमंडळात सध्या सहा जागा रिक्त असून मुख्यमंत्र्यांना चार जागा भरायच्या आहेत. जर वरिष्ठांनी मंत्रिमंडळातील फेरबदलास मान्यता दिली तर ४-५ मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्‍यता आहे आणि नवीन आमदारांचा समावेश होईल.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

Property Rights: सासू-सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला हिस्सा मिळतो का? घर, जमीन, दागिन्यांमध्ये कायदा काय सांगतो?

माझा एक भाऊ मुंबईत आहे, ठाकरे साहेब! नर्गिस यांनी संजय दत्तला दिलेला सल्ला; म्हणाल्या, 'कोणतीही अडचण आली तर...

Suryakumar Yadav मुंबई संघालाही नकोसा का झाला? धाडसी निर्णयाची Inside Story

FACT CHECK : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी विराट कोहलीने पाच कोटी घेतले? मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राने एकच खळबळ

SCROLL FOR NEXT