Karnataka State Transport Corporation decision for Transportation electric buses in January 
कोल्हापूर

नविन वर्षात कर्नाटकात सफर करा आता नविन बसमधून

विकास पाटील

निपाणी (बेळगाव) : कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने नुकसान टाळण्यासह खर्चाची बचत करण्यासाठी परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्या 360 इलेक्ट्रीक बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेसना केंद्र व राज्य सरकारने अनुमती दिली आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरु आहे. सध्या या बसेस प्रायोगिक तत्वावर बंगळूर येथे सुरु केल्या आहेत. तेथे त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून डिझेल खर्चाची बचत होत आहे. त्याचा फायदा महामंडळाला होणार आहे. जानेवारी 2021 मध्ये हुबळ्ळी, चिक्कोडी विभागात या बसेस दाखल होणार असून त्या शहरी भागासह लांब पल्ल्यावर धावणार आहेत. सुरुवातीच्या काळात पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर ५ बसेस पाठविल्या जाणार आहेत. त्याचा प्रतिसाद पाहून पुढील जादा बसेस देण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. 


गेल्या आठ महिन्यापासून कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र बंदसदृश्य परिस्थिती होती. तसेच लाॅकडाऊन असल्याने बससेवा ठप्पच झाली होती. त्यामुळे परिवहन महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे. तसेच निधीची तरतूद करून कर्मचाऱयांचे वेतन द्यावे लागले आहे. गेल्या दोन महिन्यापासून शहरासह लांब पल्ल्याच्या बसेस सुरु झाल्या आहेत. मात्र ग्रामीण भागातील बससेवेला प्रवाशांचा अद्यापही प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. त्यामुळे काही गावात रिकाम्याच बसेस धावत आहेत. त्यामुळे डिझेलसह दुरुस्तीच्या खर्चाचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत आहे. त्यासाठी ही पर्यायी व्यवस्था शोधली असून त्याचा लाभ होणार आहे. बंगळूर विभागात या बसेस सध्या सुरु आहेत. त्यामुळे आठ महिन्यापासून झालेला तोटा काही अंशी भरून निघत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा- सात वर्षांनंतर आई-मुलाची  माऊली कृपेने झाली भेट

`सध्या बंगळूर येथे प्रायोगिक तत्वावर इलेक्ट्रीक बससेवा सुरु केली आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. डिझेल खर्चाचीही बचत होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात चिक्कोडी, निपाणीतून ही सेवा सुरु करणार आहोत.`
-व्ही. एम. शशीधर, विभागीय नियंत्रणाधिकारी, चिक्कोडी.

अशी असेल बस
*२ तास चॅर्जिंगवर धावणार ३०० किलो मीटर.
*आरामदायी आसन क्षमता ६०.
*स्वयंचलित दरवाजे २.
*बसमध्येच मिळणार पुढील थांब्याच्या सूचना.
*बॅटरी, अल्टरनेटरचा वापर. 
*डिझेल खर्चाची होणार बचत.
*शहरासह लांब पल्ल्याच्या प्रवासास उपयुक्त.
*महामंडळाचे आर्थिक उत्पन्न वाढणार.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Kale Murder Case: काळे हत्येचा धागा आंदेकर टोळीपर्यंत? आरोपींची नावे अन् ‘कनेक्शन’ समोर... मोठी अपडेट

'विवेक मेरी माँ मर रही है' नॉन व्हेज खात शाहरुख मित्राला म्हणाला...'क्या तुम जानते हो विवेक?'

Pandharpur Kartiki Ekadashi: एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा; नांदेडचे वालेगावकर दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

Pune Lawyers Protest : वकील उद्या लाल फीत लावून कामकाज करणार, वकील संरक्षण कायद्याची मागणी

भारताकडून अंडर १९ वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT