quarantine  
कोल्हापूर

महाराष्ट्राहून येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन सक्तीचे ; कर्नाटकाचा निर्णय

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - देशात विविध राज्यात कोरोना संसर्ग वाढला आहे. त्यापैकी महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि राजस्थान राज्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. या राज्यातून कर्नाटकात येत असलेल्यांना 14 दिवस क्वारंटाईन सक्तीचे असणार आहे. 17 मेपर्यंत नियम जारी लागू आहे.

देशात विविध राज्यात स्थलांतरीतांचे प्रश्‍न गंभीर बनले आहेत. आर्थिक चणचण भासते आहे. पोटाची खळगी भरणे कठीण झाले आहे. त्यासाठी घरी जाण्याची ओढ लागलेली आहे. त्यानुसार तिसऱ्या टप्यतील लॉकडाऊन घोषित केले. त्यावेळी उत्तर भारतीय वा अन्य राज्यातील व्यक्तींना त्यांच्या घरी जाण्यासाठी सेवा सिंधू योजनेखाली अर्ज करण्यास स्पष्ट केले आहे. त्यानुसार अर्ज केलेल्यांना घरीही सोडले. शिवाय प्रवेशही देण्यात आला. अलिकडे नियमात बदल केला. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान किंवा अन्य राज्यातील व्यक्ती कर्नाटकात येण्यासाठी इच्छूक असल्यास त्यांना त्वरीत ऑनलाईन परवानगी मिळत आहे. यासोबत एक मेसेजही त्यांना पाठविला आहे. त्यामध्ये कर्नाटकात आल्यास 14 दिवस क्वारंटाईन केले जाईल, अशी माहिती दिली आहे. सक्तीच्या क्वारंटाईमुळे तारांबळ उडाली आहे. अनेकांनी कर्नाटक दौरा रद्द केला. काहींनी विनंती आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. क्वारंटाईन बंधनकारक केले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

मुंबईत राहणाऱ्या माय लेकांनी सेवा सिंधूतर्गंत एप्रिल महिन्यांत अर्ज केला होता. एक ते दोन आठवडे अर्ज प्रलंबित राहिले. चार दिवसांपासून कार्यवाही सुरु केली. कर्नाटकात येण्यास मुभा दिली. पण, त्यासोबत एक अट घातली आहे. 14 दिवस क्वारंटाईन सक्तीचे असेल, असे स्पष्ट केले. हे एक प्रतिनिधीक उदाहरण आहे. प्रत्येकालाच क्वारंटाईन सक्तीचे असणार असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट केले आहे. क्वारंटाईन कालावधीत प्रकृती ठणठणीत असल्यास संबधीत अधिकारी घरी सोडू शकतील. पण, संशयित रुग्ण वाटल्यास स्वॅब घेऊन प्रयोगशाळेला पाठविले जाईल. अहवाल निगेटिव्ह आल्यास घरी सोडण्यात येईल, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT