Ambabai Temple Kolhapur esakal
कोल्हापूर

Ambabai Temple : 'दहावी उत्तीर्ण असणारे धर्मशास्त्र अभ्यासक कसे? अंबाबाई मंदिरातून त्यांना तात्काळ निलंबित करा'

सध्याचे अभ्यासक हे दहावी उत्तीर्ण असून त्यांना सातव्या वेतन आयोगाचे वेतन देऊ केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

दहावी उत्तीर्ण असणाऱ्या या धर्मशास्त्र अभ्यासकांनी मंदिरातील वातावरण कलुषित करून मंदिरात नसलेल्या प्रथा सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात (Ambabai Temple) पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने (West Maharashtra Devasthan Committee) धर्मशास्त्र (DharmaShastra) अभ्यासकांची नियुक्ती केली आहे. दहावी उत्तीर्ण असणाऱ्या या धर्मशास्त्र अभ्यासकांनी मंदिरातील वातावरण कलुषित करून मंदिरात नसलेल्या प्रथा सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करावे, अशी मागणी श्री करवीर निवासिनी महिला बहुउद्देशीय संस्थेने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

निवेदनात (Karveer Niwasini Sanstha) म्हटले आहे, आचारसंहिता असताना २०२२ च्या पोटनिवडणुकीमध्ये जाहिरात काढून हे पद भरले आहे. आचारसंहिता चालू असताना ही नेमणूक केली आहे. सध्याचे अभ्यासक हे दहावी उत्तीर्ण असून त्यांना सातव्या वेतन आयोगाचे वेतन देऊ केले आहे. देवस्थानमध्ये कार्यरत असणारे कोणतेच कर्मचारी कायम नाहीत. अशावेळी यांना वेगळी वागणूक कशी दिली गेली.

Ambabai Temple Kolhapur

तसेच या अभ्यासकांचे वर्तनही वातावरण कलुषित करणारे आहे. कर्मचाऱ्यांशी वादविवाद करणे, विविध प्रथा परंपरांमध्ये अडथळा निर्माण करणे, अंबाबाई मंदिर प्रांगणात कुठलीही कायमस्वरूपी गोष्ट तयार करताना पुरातत्व खात्याची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे असताना नवग्रह मंडपाजवळ या अभ्यासकांनी हवन कुंड तयार करून घेतला असून, त्याचा आजवर कधीही वापर झालेला नाही.

नवग्रह मंडपासारख्या ऐतिहासिक वास्तूजवळ असे कुंड निर्माण करून या शिल्पांना धोका निर्माण झाला आहे. अशा अभ्यासकांना त्वरीत निलंबित करावे. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा संगीता खाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT