kdc given Loans will also to milk producers and fishermen 
कोल्हापूर

कोल्हापूरकरांसाठी गुड न्यूज; आता दूध उत्पादक आणि मत्स्यव्यवसायकांनाही मिळणार कर्ज 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्हा सहकारी बॅंकेकडून किसान कार्ड क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत दूध उत्पादक व मत्स्यव्यवसायकांनाही कर्ज दिले जाणार आहे. योजनेचा प्रारंभ अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते केंद्र कार्यालयात झाला. बैठकीत नाबार्डच्या दोन नव्या कर्ज योजनांनाही मंजुरी दिली. कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. 

मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आमदार राजेश पाटील, आर. के. पवार, प्रताप उर्फ भय्या माने, असिफ फरास, संतोष पाटील, संचालक यांच्यासह नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक उपस्थित होते. 

संचालक मंडळाच्या हस्ते प्रयाग चिखली सेवा संस्थेमार्फत दत्त दूध संस्थेच्या दहा सभासदांना 96 हजार रुपये व पाडळी बुद्रुक येथील राजर्षी शाहू विकास सेवा संस्थेमार्फत जयभवानी दूध संस्था, वीर हनुमान दूध संस्था, लोकसेवा दूध संस्थेच्या सभासदांना पाच लाख पतपुरवठा झाला. कोल्हापुरात 70 वर्षांपासून कार्यरत श्री भोईराज मत्स्य व्यावसायिक संस्थेच्या 28 सभासदांना दोन लाख दहा हजार कर्जपुरवठा केला. 

मुश्रीफ म्हणाले, ""खेळत्या भांडवली कर्जामुळे दुग्ध उत्पादक व मत्स्य व्यावसायिकांना चालना मिळणार आहे. यापूर्वी बॅंक फक्त म्हशीसाठी मध्यम मुदत कर्ज देत होती. या रूपाने आता कॅश क्रेडिटही सुरू केले. 60 ते 65 मच्छिमार संस्थांना लाभ होईल.'' 

अन्य दोन योजनांना मंजुरी 
सोसायट्यांना गोदाम बांधकाम, कृषी सेवा, प्रक्रिया केंद्र, सूचना केंद्र, ग्राहक भांडार आदी सुविधांसाठी चार टक्के व्याजाने सात वर्षे मुदतीचे कर्ज दिले जाणार आहे. कर्जाच्या दहा टक्के किंवा दोन लाख अनुदान आहे. केंद्र सरकारने शेतीमध्ये पायाभूत निधी अंतर्गत कर्ज योजना लागू केली आहे. सुगी पश्‍चात गोदाम बांधकाम, पॅकिंग हाऊस, ग्रेडिंग, शीतसाखळी, वाहतूक केंद्र, फळे पिकवणी प्रकल्प उभा करता येणे शक्‍य आहे. यासाठी शेतकरी, सेवा संस्था, तालुका संघ पात्र असतील. 

दृष्टिक्षेपात कर्ज योजना 
- केंद्र व राज्य सरकारची योजना 
- बॅंकेशी संलग्न सोसायटीचे शेतकरी पात्र 
- म्हशीसाठी पाच; गाईसाठी चार हजार कर्ज 
- बॅंकेशी संलग्न मत्स्य व्यावसायिक सभासदांना प्रत्येकी साडेसात हजार 
- दोन्ही योजनांना सात टक्के व्याज 
- व्याज परतावा शासनाकडून मिळणार 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT