KDCC bank take care of covid affected employees in kolhapur 
कोल्हापूर

केडीसीसी बॅंक उचलणार कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा भार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनामुळे मृत कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या पाठीशी बॅंक पहाडासारखी उभी आहे, असा विश्वास बॅंकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. कोरोनाग्रस्त होऊन बरे झालेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च बॅंक देणार असल्याचेही जाहीर आहे. 

बॅंकेचे अधिकारी व कर्मचारी संजय आण्णासो पाटील (टाकळी, शाखा अकिवाट), अशोक भाऊ पाटील (हडलगे, शाखा महागाव), पांडुरंग मुरलीधर शेंडगे (कुंभोज, शाखा हातकणंगले) व प्रशांत प्रकाश नाईक (कागल, शाखा केंद्र कार्यालय) यांचा कोरोनाविरोधातील लढ्यात कर्तव्य बजावत असताना त्यांना मृत्यू आला आहे. बॅंक त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी पहाडासारखे उभे आहोत, असा विश्‍वासही मुश्रीफ यांनी पत्रकातून दिला आहे. 

यापूर्वीच बॅंकेने मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना दहा लाख रुपये एलआयसीकडून विमाकवच घेतले आहे. बॅंकेने नफ्यातून पाच लाख रुपये व ईडीएलआय योजनेतून ( एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्‍ड इन्शुरन्स स्कीम) सहा लाख रुपये असे एकूण 21 लाख रुपये कुटुंबीयांना मिळण्याची व्यवस्था केलेली आहेच. त्याशिवाय, अनुकंपा तत्त्वावर लवकरच त्यांच्या वारसांस सेवेत रुजू करून घेण्याचे ठरले आहे.

यापुढे फक्त जे या महामारीने आजारी पडतील, त्याना दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी बॅंकेच्या कल्याण मंडळाकडून दोन लाख रुपयेपर्यंत दवाखान्याच्या खर्चासाठी विमा दिला जाणार आहे. महामारीने आजारी पडून बरे होऊन घरी परतले आहेत व दवाखान्याचा खर्च भागवला आहे. त्यांना बॅंकेच्या वैद्यकीय सहायता निधी योजनेमधून दोन लाखापर्यंतचा योग्य खर्च देण्याचा विषय आजच्या विषय पत्रिकेवर आहे. यासंदर्भातील योग्य ती नियमावली बॅंक लवकरच जाहीर करणार असल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे. 

संचालकांनी मंजुरी द्यावी 

शुक्रवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत या दोन्हीही विषयांना मंजुरी देण्याची विनंती मुश्रीफ यांनी केली आहे. विषय पत्रिका फायनल केली व मलाच या रोगाने खाजगी दवाखान्यामध्ये दाखल होण्याची वेळ आली. माझी तब्येत उत्तम आहे, काळजी करू नये. लवकरच पूर्ववत या साऱ्या लोकांना आधार देण्यासाठी व सेवेसाठी रूजू होत आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT