keshavrao bhosale theater start from today with permission of corporation in kolhapur 
कोल्हापूर

कलाकरांसाठी गुड न्युज : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा उघडला!

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गेली नऊ महिने कोरोनामुळे बंद असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाटयगृहाचा पडदा आजपासून उघडला. शासनाच्या सर्व मार्गदर्शक नियमानुसारच नाट्यगृहात विविध कार्यक्रमांना आता प्रारंभ होणार आहे. 

पंधरा मार्चपासून नाट्यगृहातील सर्व कार्यक्रम बंद होते. गेल्या महिन्यात शासनाने नाट्यगृहे सुरू करण्याच्या सूचना केल्या. पण, काही तांत्रिक बाबींमुळे केशवराव भोसले नाट्यगृह बंद होते. या पार्श्‍वभूमीवर काल नाट्य परिषदेच्या येथील पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली होती. पालकमंत्री पाटील यांनी महापालिका प्रशासनाला याबाबत सूचना केल्यानंतर नाट्यगृहाचा पडदा आजपासून खुला झाला. 

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या टाळेबंदीच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील बंधनकारक असणाऱ्या सुचना व मार्गदर्शक तत्वे यांचे अनुपालन करून नाटयगृह सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नाटयगृहाचा वापर हा आसन क्षमतेच्या 50 टक्के इतकाच राहिल. 

मास्क असल्याखेरीज कोणलाही नाट्यगृहात प्रवेश दिला जाणार नाही. प्रेक्षकांचे तापमान तपासणी, निर्जंतुकीकरण, कलाकारांची वैद्यकीय तपासणी, सुरक्षित अंतर, परिसरात स्वच्छता, थुंकण्यास मनाई, नाटयगृहात प्रवेश करताना सुरक्षित अंतर ठेवून रांग करणे, नाटयगृहात खाद्यपदार्थांना मनाई आदी बाबींचे शासन मार्गदर्शक तत्वानुसार काटेकोर पालन केले जाणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT