"Khari" party found in the clutches of "Khaki" uniform 
कोल्हापूर

"खारी' पार्टी सापडली  "खाकी' वर्दीच्या तावडीत 

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील एका पोल्ट्री शेडमध्ये खारी पार्टी करणाऱ्या नऊ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिघे पळून गेले असून सहा जणांना ताब्यात घेतले. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवला आहे. विरेश रंगराव मोर्ती, दीपक पांडूरंग पोटे, भास्कर दिनकर पाटील, विशाल सूर्यकांत तोडकर, लक्ष्मण पांडूरंग कुंभार, विशाल सदाशिव पताडे यांना ताब्यात घेतले असून पळून गेलेल्यांमध्ये आकाश अशोक नौकूडकर, राहूल रावसाहेब होडगे व अमर पांडूरंग पाटील यांचा समावेश आहे.

पोलिसांनी सांगितले की, हरळीतील सिताफ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये 20 ते 25 युवक खारी पार्टी करीत असल्याची माहिती पोलिस पाटील रेणुका परीट यांना दूरध्वनीवरून कळाली. त्यानंतर सौ. पाटील यांनी पोलिस ठाण्याला या घटनेची माहिती दिली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशिद यांनी सहकाऱ्यांसह संबंधित पोल्ट्री फार्मजवळ जाताच पार्टी करणाऱ्यातील काही जण तेथून पळून गेले. ज्यांना ताब्यात घेतले, त्यांच्याकडे अधिक चौकशी करता पळून गेलेल्यांची नावेही समजली. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी सुरू आहे. गर्दी केल्याने कोरोनाचा प्रसार होतो हे माहीत असूनही या युवकांनी जाणीवपूर्वक सोशल डिस्टन्सचे पालन न करता एकत्र येवून पार्टी करीत असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पोलिसांनी रात्रीच युवकांची रवानगी थेट ठाण्यात केली. रात्री उशिरा या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. हवालदार श्री. गोजारे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT