Kharmati put in front of the appeal board  
कोल्हापूर

कचरा न टाकण्याच्या आवाहन फलकासमोरच टाकली खरमाती 

प्रकाश पाटील

कंदलगाव : कचरा उठावास होणारा विलंब व शहरापासून लांब अंतरावर असणाऱ्या शेंडा पार्क परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांतून वारंवार तक्रारी येऊ लागल्याने अखेर या परिसरात कचरा टाकू नये...यासाठी सावधानतेचा फलक लावून महापालिका आरोग्य विभागाने नागरिकांमध्ये जनजागृती केली खरी.

मात्र, अज्ञाताने या फलकाकडे दुर्लक्ष करून अगदी फलका शेजारीच खरमातीची ट्रॉली रिकामी करून पळ काढला. या खरमातीमुळे आर. के. नगर नाक्‍या शेजारील नाला पूर्णपणे बंद झाला असून नाल्यातील पाणी तुंबले आहे. गेल्या पंधरा दिवसा पूर्वीच या परिसरातील नालेसफाई झाली असून पुन्हा काही नागरीकांच्या कृत्यामुळे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य वाढू लागल्याने आशा नागरीकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. 

सुभाषनगर ते शेंडा पार्क परिसरात मुख्य रस्त्यावर कचरा अथवा अतिक्रमण होत असल्यास त्यांची गय केली जाणार नाही. अशा लोकांवर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत . इथून पुढे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार . 
- भूपाल शेटे, माजी उपमहापौर 

रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्ति कडून या परिसरात वारंवार कचरा टाकणे, खरमाती टाकण्याचे प्रकार घडतात. सीसीटीव्हीच्या माध्यमातून अशा नागरिकांवर कारवाई व्हावी. 
- मनिष बागे, आर. के. नगर. 

दृष्टिक्षेप 
- शेंडा पार्क परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी 
- वारंवार तक्रारीनंतर कचरा न टाकण्याचा लावला फलक 
- अज्ञाताने फलकासमोरच टाकली खरमाती 
- खरमातीमुळे आर. के. नाक्‍याशेजारचा नाला झाला बंद 


संपादन :प्रफुल्ल सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025 : सरकारच्या आदेशानुसार भारत-पाकिस्तान सामना, नियमांचं पालन करणार; अरुण धुमल यांचं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

BDCC Bank : बीडीसीसी बँकेसमोर काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी; सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा BJP चा आरोप

Latest Marathi News Updates : नऊ दिवस बंद ठेवलेला करूळ घाटमार्ग आज दहाव्या दिवशी वाहतुकीस खुला

Maharashtra Politics: सहा जि.प.वर राहणार नारीशक्तीची सत्ता; अकोला, वाशीम, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदियाचा समावेश

Mumbai : अभिनेत्रीनं धावत्या लोकलमधून मारली उडी, डोक्याला अन् पाठीला गंभीर दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT