kidaney donet for younger brother from big brother in kolhapur 
कोल्हापूर

लहान भाऊ भोगतोय यातना म्हणुन मोठ्या भावाने दिली स्वतःची किडनी...

रमजान कराडे

नानीबाई चिखली (कोल्हापूर) - दोन्ही किडन्या खराब झाल्याने दु:ख, वेदना अंगावर घेत मरणप्राय यातना भोगत असलेला लहान भाऊ. याच भावाला मृत्यूच्या विळख्यातून सहीसलामत सोडवण्यासाठी बंधूप्रेमाने वेडा झालेला मोठा भाऊ. ज्याने पुढाकार घेत स्वतःची किडनी दान करीत लहानग्याच्या आयुष्यात जगण्याचा ‘प्रकाश’ पेरला. यामुळे मोठ्या भावाच्या मोठ्या मनाने राम-लक्ष्मणचं नातं आणखी मजबूत झालेलं पहायला मिळाले. येथील सवळेकरी बंधूंच्या अस्सीम प्रेमाची ही कहानी आहे. प्रकाश व रमेश या सवळेकरी बंधूंनी स्वार्थाच्या वादळात रक्ताच्या नात्यांसमोर आदर्श ठेवण्याचे काम केले.  

सैन्यदलातील अठरा वर्षांच्या नोकरीनंतर रमेश यांनी कागल येथील शाहू कारखान्यात १७ वर्षे नोकरी स्विकारली. मात्र, सततच्या धावपळीत वाढलेली शारीरिक दुखणी तशातच ब्लडप्रेशरचा त्रास वाढल्याने त्यांनी औषध सुरू केले होते. परंतु याच औषधांचा ओव्हरडोस झाल्याने त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. यावर उपाय म्हणून त्यांनी कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात डायलेसिसचे उपचार सुरू केले. 
गेली दोन वर्षे डायलेसिससाठी कोल्हापूरला आठवड्यातून दोन वेळा जाताना होणारा त्रास, त्यासाठी येणारा खर्च पाहताना जगण्याची उमेद हरविलेल्या लहान भावाचे डोळ्यासमोर होत असलेले हाल पाहताना प्रकाशने किडनी देण्याचा निर्णय घेतला. 
मात्र, दोघांचे रक्तगट भिन्न असल्याचे लक्षात आल्याने किडनी प्रत्यारोपणाची अडचण निर्माण झाली. 

यावेळी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये अडचण दूर करण्यासाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची तीन इंजेक्‍शने दिली. 
त्यानंतर किडणी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. यावेळी सदलगा येथील डॉ. अमोलकुमार पाटील यांचे 
सहकार्य लाभले. 

माझ्या किडनी देण्याने त्याचे आयुष्य वाढणार होते. हा माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद होता. यामुळे त्याचा विरोध डावलत मी किडनी दिली. आज खूप समाधान वाटत आहे. पैसा आज आहे उद्या नाही. मात्र नात्यांची ही वीन घट्ट राहिली पाहिजे.
- प्रकाश सवळेकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT