Kids in the classroom and teachers at home case education marathi news kolhapur 
कोल्हापूर

अजबच ! मुलं वर्गात, शिक्षक घरात; काय आहे नेमका प्रकार वाचा !

सदानंद पाटील

कोल्हापूर : कोरोनानंतर आता  शाळा सुरु झाली आहे. शाळेत मुलांना पाठवण्यासाठी पालकांच्या मनातील भिती घालवण्यासाठी, मानसिक तयारी करण्यासाठी अनेक प्रयोग केले गेले. पालक ही तयार झाले. त्यामुळे वर्ग ही आता गजबजू लागले आहेत. मात्र आता शिक्षकच गायब होऊ लागले आहेत.  आज मुलं वगार्त आणि शिक्षक घरात, असाच काहीसा प्रकार घडला आहे जिल्हा परिषदेच्या गिरगाव (ता.करवीर) येथील शाळेत. काय आहे प्रकार जाणून घेऊया.

 शनिवार असल्याने मुलं सकाळच्या शाळेसाठी 8 वाजून 30 मिनिटांनी दाखल झाली.  मुलांनी सर्व शाळा झाडून काढली, मात्र 9 वाजून 15 मिनिटापर्यंत कोणीही शिक्षक या शाळेकडे फिरकला नाही.  शिक्षक न आल्याचे काही पालकांच्या ध्यानात आले. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी करवीर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली. या घटनेचा चौकशी अहवाल सादर करण्यात आला असून शाळेतील संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. 

शिक्षकांवर कारवाईची मागणी

शनिवारी विद्या मंदिर गिरगाव येथे सकाळची शाळा असल्याने मुलं सकाळी सात पासून शाळेत दाखल झाली.  बहुतांश मुलं शाळेत हजर होती. या शाळेत मुख्याध्यापकांसह सात स्टाफ आहे. मात्र एकही शिक्षक सकाळी सव्वा नउ वाजेपर्यंत शाळेत हजर नव्हते. मुलांनी शाळेची झाडलोट केली तरी शिक्षक शाळेत आले नाहीत. काही पालक मुलांना शाळेत सोडण्यासाठी आले असता त्यांना एकही शिक्षक हजर नसल्याचे आढळून आले. त्यामुळे इतर पालकांना, शाळा व्यवस्थापन समितीला निरोप देण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील हे देखील शाळेत दाखल झाले. त्यांनी करवीर पंचायत समिती शिक्षण विभागास फोन करुन तात्काळ अधिकारी पाठवण्याची मागणी केली. 

शिक्षकांच्या गैरवर्तणुकीने पालकांमधून संताप

ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेवून विस्तार अधिकारी सौ.भारती कोळी यांना चौकशीसाठी या शाळेत पाठवण्यात आले. त्यांनी पालक, विद्यार्थी व शालेय व्यवस्थापन समितीशी चर्चा करुन अहवाल सादर केला आहे. या अहवालातही शाळा सुरु असताना एकही शिक्षक हजर नसल्याचे तसेच मुख्याध्यापक परस्परच मिटींगला गेले असल्याचे सांगण्यात आले. तसेच दर शनिवारी गावात शाळाच भरत नसल्याची तक्रारही पालकांनी केली आहे. तिसरीच्या वर्गशिक्षिका सौ.माळी यांनी सोमवारपासून वर्गच बंद असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांना सांगितले. एकूणच शाळेतील शिक्षकांच्या गैरवर्तणुकीने पालकांमधून मोठा संताप व्यक्‍त असून सर्वांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vat Purnima : आज वटपौर्णिमा; सकाळी ६ ते १०.३० हा पूजेसाठी उत्तम कालावधी, दुपारी १२.०८ ते १२.५९ या वेळेतही करता येईल पूजा; भद्रा काळ वर्ज्य नाही

Petrol-Diesel Rate Today: 29 जूनला देशभरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई-पुण्यात 1 लिटरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

Khidrapur Kopeshwar Temple : अद्‌भूत शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेलं ऐतिहासिक कोपेश्वर मंदिर पर्यटकांसाठी सुरू; पण आंदोलन कायम, काय आहे कारण?

Pune News : पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे उमेश शेळके

Kedgaon Crime : गर्भलिंगनिदान रॅकेटचा मोबाइल व्हॅनद्वारे विस्तार; मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागेना

SCROLL FOR NEXT