killed of a friend in Vasagade over a drinking dispute 
कोल्हापूर

मित्रानेच केला मित्राचा घात : दारूचा घोट ठरला त्याच्यासाठी अखेरचाच

सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर (कोल्हापूर)  : दारू पिताना झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केला. हा प्रकार वसगडे (ता. करवीर) येथील समाजमंदिराच्या सभागृहात काल रात्री साडेआठच्या दरम्यान घडला. यात रोहिदास उल्हास कांबळे (वय २८, रा. वसगडे) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी संशयित जगदीश नायकू कांबळे (२७, रा. वसगडे) याचा पोलिस शोध घेत आहेत.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी 

रोहिदास आणि जगदीश मित्र आहेत. दोघेही मोलमजुरी करतात. काल रात्री सव्वाआठच्या सुमारास वसगडे येथील समाजमंदिराच्या सभागृहात दोघेही दारू पिण्यास 
बसले. दारू पिताना दोघांमध्ये वाद झाला. तो विकोपाला गेला. दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. जगदीशने रोहिदासला खाली पाडले आणि छातीवर बसून हाताने गळा दाबला. गळा इतक्‍या जोराने दाबला गेला की रोहिदासचा जागीच मृत्यू झाला.

याची माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनीही घटनास्थळी भेट दिली. रोहिदासचा मृतदेह प्रथम गांधीनगर येथील शासकीय वसाहत रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर तो उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आला.याबाबतची फिर्याद रोहिदासचे वडील उल्हास चुडाप्पा कांबळे यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली. जगदीश कांबळेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT