कोल्हापूर

किसान पुत्र संघर्ष यात्रा निघाली दिल्लीला, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनतर्फे आयोजन

A

कोल्हापूर ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनतर्फे किसान पुत्र संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या या यात्रेला आज न्यू कॉलेजमधून प्रारंभ झाला. यामध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सांगली, सातारा, पुणे या मार्गे ही यात्रा 8 फेब्रुवारीला मुंबईमध्ये पोहचणार आहे. तेथून दिल्लीला रवान होणार आहेत. 
जिल्ह्यातून जाणाऱ्या जथ्थ्याच्या यात्रेचा प्रारंभ न्यू कॉलेज येथून यात्रेला प्रारंभ झाला. तेथून बिंदू चौकात युवकांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवाद केले. तेथून दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन युवकांनी घेतले. बावड्यातील शाहू जन्मस्थळी जावून युवकांनी अभिवादन केले. तेथून पहिली सभा शिंगणापूरमध्ये झाली. येथून ही यात्रा सांगली जिल्ह्यात जाणार आहे. प्रशांत अंबी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले," तीन कृषी कायदे भांडवलदारांच्या हितासाठी व लोकशाही तसेच शेतकरी विरोधी आहेत. सरकारला हमीभावाचा कायदा करायला कोणतीही अडचण नाही. कंत्राटी शेतीने जगभर कोणतेही फायदे झाले नाहीत.'' 
युथ फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षा आरती रेडेकर यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष हरीश कांबळे यांनी आभार मानले. यावेळी बी एल बर्गे, गिरीश फोंडे, उपप्राचार्य टी. के. सरगर, शाहीर रणजित कांबळे, धीरज कठारे, हर्षवर्धन कांबळे, संदेश माने, केदार तहसीलदार, योगेश कसबे, कृष्णा पानसे ,प्रा. बाबुराव घुरके, जावेद तांबोळी उपस्थित होते.

संपादन ः यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: कचरा संकलनासोबत कर वसुलीवरही नजर; नव्या कंपनीला महापालिका आयुक्तांच्या सूचना

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

Ahilyanagar News: अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी थकीत; ठेकेदार आर्थिक अडचणीत, २० टक्केच निधी प्राप्त!

Chhatrapati Sambhajinagar: एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेत ६९.३३ टक्के उपस्थिती; स्पर्धा परीक्षा;शहरातील ३६ केंद्रांवर ३ हजार ५६९ उमेदवारांची दांडी.

Chhatrapati Sambhajinagar: दुकानातील अंगठी बोटात घालून पळण्याचा प्रयत्न; जयभवानीनगर परिसरातील घटना, अल्पवयीन मुलाला तातडीने पकडले.

SCROLL FOR NEXT