कोल्हापूर

पदरमोड करूनही केएमटीचे अडकले साडेतीन कोटी 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या केएमटीचे सुमारे 3 कोटी 70 लाख रुपये थकीत बिलापोटी जिल्हा प्रशासनाकडे अडकून पडले आहेत. आपत्कालीन व्यवस्थेत 40 बसगाड्या रात्रंदिवस धावल्या. संकटकाळी केएमटीची मदत झाली, मात्र आता केएमटी संकटात असताना तिच्या मदतीला कोणी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. 
मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून लॉकडाउनला सुरवात झाली. मार्च ते सप्टेबरपर्यंत बसगाड्या आपत्कालीन व्यवस्थेत राहिल्या. पदरचे डिझेल तसेच कर्मचारी देऊन केएमटी कार्यरत राहिली. एकतरी केएमटी चाके पूर्णपणे थांबली. दुसऱ्या बाजूला तपासणी नाक्‍यावरून लोकांना आणण्यापासून ते स्वॅब घेतल्यानंतर क्वारंनटाईन सेंटरपर्यत पोहचविण्याची जबाबदारी केएमटीच्या चालकांनी उचलली. कोरोनाच्या काळात कोणी जवळ येत नसताना चालक, वाहकांनी जीव धोक्‍यात घालून परगावाहून येणाऱ्या लोकांची व्यवस्था केली. 
मे, जून, जुलै, ऑगस्टमध्ये केएमटीवर सर्वाधिक ताण होता. डिझेल तसेच गाड्यांची देखभाल दुरुस्ती. चालक, वाहकांचा पगार केएमटीच्या तिजोरीतून झाला. दिवाळी जवळ आल्याने हा महिना तसेच दिवाळीच्या काळातील पगार 100 टक्के मिळावा, यासाठी संघटनेने संपाचा इशारा दिला आहे, तरीही जिल्हा प्रशासन बिलांपैकी रुपयाही देण्यास तयार नाही. 
सध्या कोरोनाचा भारही हलका झाला आहे. काही मार्गावर केएमटीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत, पण प्रवासी अजूनही फारसे येत नाहीत. पूर्वी दररोजचे सव्वाआठ लाखांचे उत्पन्न आता 15 ते 20 हजारापर्यंत आले आहे. संकटकाळात चालक, वाहक तसेच कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देत 75 टक्के पगाराची अट मान्य केली. गाड्यांवर कशा पद्धतीने खर्च झाला. याची आकडेवारी केएमटी व्यवस्थापनाने जिल्हा प्रशासनाला दिली आहे. तीन कोटींच्या रकमेबाबत पाठपुरावा सुरू आहे, मात्र दाद कोणाकडे मागायची? असा प्रश्‍न केएमटी व्यवस्थापनाला पडला आहे. 


सणासुदीत पगाराची प्रतीक्षा 
डिझेल टाकण्यासाठी पैसै नसताना केएमटीने आर्थिक ओढाताण सहन करत लोकांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेतली. "बिनपगारी आणि फुल्ल अधिकारी' चालक तसेच वाहकांची अवस्था झाली. आज ना उद्या पैसे मिळतील, या आशेवर व्यवस्थापन होते. सणासुदीचे दिवस त्यात 100 टक्के पगाराची मागणी दुसऱ्या बाजूला थकीत रकमेची प्रतीक्षा अशा संकटात केएमटी सापडली आहे. 

जिल्हा प्रशासन अडचणीत होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या मदतीला धावलो. कोरोना पॉझिटिव्ह तसेच निगेटिव्ह रुग्णांची ने आण केली. कोगनोळी, अंकली पूल, उचत, शाहूवाडी अशा जिल्ह्यांच्या सर्वच भागात केएमटी सुरू होती. 24 तासाला 12 हजार रुपये दराप्रमाणे आकारणी लावली. आरटीओनेही बिले योग्य असल्याचे म्हटले आहे. अशा स्थितीत कायद्याने द्यायचे ते तरी प्रशासनाने द्यावे. 
- पी. एन. गुरव, प्रकल्पाधिकारी, केएमटी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT