KMT will save costs; A bus will run on CNG 
कोल्हापूर

केएमटी करणार खर्चात बचत; एक बस चालवणार सीएनजीवर 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनामुळे लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशामुळे बुधवारी (ता. 8) परिवहन समितीची सभा ऑनलाईन घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी परिवहन समिती सभापती सौ. प्रतिज्ञा उत्तुरे या होत्या. परिवहन समिती सदस्य अशोक जाधव यांनी कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये केएमटीकडील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. परिवहन उपक्रमाच्या खर्चात बचतीसाठी डिझेल इंजिनवरील एक बस प्रायोगिक तत्वावर बायो-सिएनजी इंजीनमध्ये रुपांतरीत करण्याचा विषय या बैठकीमध्ये चर्चा करुन मंजूर करण्यात आला. 

बैठकीमध्ये कार्यपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर केले. अशोक जाधव यांनी केएमटी कर्मचारी हे आरोग्य यंत्रणा व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे बसवर जोखमीचे काम करत असल्याने त्यांना शासनाकडून विमा कवच उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. परिवहन उपक्रमाच्या यंत्रशाळेमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबवून खर्चात बचत करण्याचा प्रयत्न करावा, असे सूचित केले. 

शेखर कुसाळे यांनी एमआयडीसी येथील जागा विकसीत करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यशवंत शिंदे यांनी बहुतांशी बस शेडवरील पत्रे फुटल्याने गळती सुरु आहे. ती तातडीने दुरुस्त करुन घ्यावीत. तसेच जी शेड रस्त्याच्या कामासाठी काढली आहेत. ती पुर्ववत बसविण्याची कार्यवाही तातडीने करण्याची सुचना केली. यशवंत शिंदे, महेश वासुदेव, चंद्रकांत सुर्यवंशी, प्रसाद उगवे, उपायुक्त निखील मोरे, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक चेतन कोंडे, नगरसचिव सुनिल बिद्री बैठकीस उपस्थित होते. 

दृष्टिक्षेप 
- परिवहन समितीची ऑनलाईन झाली सभा 
- कोरोना कामात कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक 
- एक बस सीएनजीत रूपांतरीत करण्याला मंजुरी 
- कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्याबाबत आवाहन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT