Kohlapur Crime News esakal
कोल्हापूर

Kohlapur Crime: साडेदहा लाख रुपयांचा मुद्देमाल कोरोचीत चोरीस

१६ तोळे दागिन्यांसह रोख ५ लाख रुपयांवर डल्ला

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथे बांधकाम साहित्य व्यावसायिकाचे बंद घर चोरट्यांनी फोडले. कुलूप तोडून सोन्याचे १६ तोळ्यांचे दागिने व रोख ५ लाख १० हजार रुपये असा एकूण १० लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याची नोंद शहापूर पोलिसांत झाली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोची येथील छत्रपती कॉलनीत सचिन रुपनुरे कुटुंबिय राहण्यास आहे. ते कुटुंबासह घराला कुलूप लावून शनिवारी (ता. २८) सायंकाळी रेंदाळ येथील नातेवाईकांकडे गेले होते. आज सकाळी घरी परतले असता घराचा कडी-कोयंडा तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घरात पाहणी केली असता प्रापंचिक साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. चोरट्यांनी घरातील दोन वेगवेगळ्या खोल्यांतील २ तिजोऱ्या‍ फोडल्या. त्यातील नेकलेस, चेन, अंगठ्या, गंठण, राणीहार, कर्णफुले असे सोन्याचे १६ तोळ्यांचे दागिने, चांदीचे दागिने आणि ५ लाख १० हजार रुपये असे एकूण १० लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचे उघड झाले.

पोलिस उपनिरीक्षक दीपक माळी यांच्यासह पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. घरफोडीचे गांभीर्य पाहता पोलिसांकडून श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र तेही काही अंतरावर शहापूर मार्गावरील घोरपडे कारखान्याजवळ घुटमळले. या ठिकाणी चार ते पाच व्यापाऱ्यांची दुकाने असल्याने सीसीटिव्ही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT