Kolhapur municipal  sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : १७ जणांवर होणार फौजदारी

मुख्य लेखापरीक्षकांची शिफारस; कारवाईकडे लक्ष

डॅनियल काळे

कोल्हापूर: दोन वर्षांपासून गाजत असलेल्या घरफाळा घोटाळ्याला आता नवे वळण लागले असून १७ अधिकारी, कर्मचारी यांच्यावर फौजदारीची टांगती तलवार आहे. चौकशीनंतर यात सहभागी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर फौजदारी करण्याची शिफारस करणारा अहवाल मुख्य लेखापरीक्षकांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

फौजदारीच्या शिफारशीमध्ये काही माजी अधिकारी आणि कर्मचारी यांचाही समावेश आहे. दोन वर्षे हे प्रकरण विविध कारणांनी गाजत आहे. यापूर्वी या प्रकरणात पाच जणांवर फौजदारी करून त्यांना निलंबितही करण्यात आले आहे. मुख्य लेखापरीक्षकांच्या शिफारशीत कोणाची नावे आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गौडबंगाल असलेल्या या घोटाळ्याची व्याप्तीही समोर येणार आहे. महापालिकेचा घरफाळा विभाग दोन वर्षांपासून घोटाळ्यामुळे चर्चेत आहे. या प्रकरणात अनेकदा चौकशी झाली; परंतु कारवाई झाली नव्हती. या प्रकरणावरून माजी उपमहापौर भूपाल शेटे आणि कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. रोजच घरफाळा विभाग चर्चेत होता; मात्र ठोस असे काहीच

होत नव्हते. वरिष्ठ अधिकारीही यात जोखीम पत्करायला तयार नव्हते; मात्र अनेक पातळीवर हे प्रकरण चौकशीसाठी गेल्याने कारवाईची टांगती तलवार होती. विविध चौकशी समित्याही नेमण्यात आल्या. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी घोटाळ्यातील दोषींची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्याचाच एक भाग म्हणून या प्रकरणात त्यांनी मुख्य लेखापरीक्षकांना अहवाल तयार करून कारवाईची दिशा स्पष्ट करायला सांगितली होती. त्यानुसार हा अहवाल शिफारशीसह मुख्य लेखापरीक्षकांनी प्रशासक डॉ. बलकवडे यांच्याकडे दिला आहे. १७ जणांत काही माजी करनिर्धारक व संग्राहक, कर अधीक्षकांचाही समावेश आहे.

घोटाळ्याची व्याप्तीही होणार स्पष्ट

घरफाळा विभागातील घोटाळा नेमका किती आहे, याचे गौडबंगाल कायम आहे; परंतु हा नेमका आकडा समोर येत नाही. आता मुख्य लेखापरीक्षकांनी केलेल्या या अहवालात नुकसानीच्या रकमांचाही समावेश आहे. त्यामुळे घोटाळ्याची व्याप्ती समोर येणार आहे. घरफाळा विभागातील घोटाळ्याच्या या प्रकरणाने प्रशासनच हादरले असून या विभागात काम करायला अधिकारी, कर्मचारी कचरत आहेत. दोषींवर कारवाईची टांगती तलवार आहेच. त्यामुळेच ‘घरफाळा विभाग नको रे बाबा’ असे म्हणण्याची वेळ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Crisis : कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप! DK शिवकुमार होणार नवे मुख्यमंत्री? लिंगायत, दलित, OBC सह अल्पसंख्याक नेत्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ

Pakistan Defence Minister: ''आमचे पूर्वज हिंदूच, पाकिस्तानमध्ये चुकीचा इतिहास शिकवला जातोय'' पाकच्या संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान

SRH vs RR: प्लॅन A, B किंवा C... वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी पॅट कमिन्स सज्ज; एलिमिनेटर आधी काय म्हणाला, वाचा

Ebola Virus: आफ्रिकेनंतर भारतातही इबोलाची धास्ती! काय आहे हा जीवघेणा व्हायरस, कोणती आहेत लक्षणं? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : शिवसैनिकांनी विधान परिषदेची मागणी करणे काही चुकीचे नाही : भरत गोगावले

SCROLL FOR NEXT