kolhapur aam aadmi party altimeter to maharashtra government 
कोल्हापूर

'वीज बिल माफी केली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार'

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - सरकारने वीज बिल माफी केली नाही तर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर आंदोलन करतील, असा इशारा आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. पदवीधर आणि महापालिका निवडणुकीत पक्ष चांगली कामगिरी करेल. असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

रंगा राचुरे म्हणाले, ‘वीज बिल माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र ते अद्याप पूर्ण केलेले नाही. हिवाळी आधिवेशनापर्यंत वीज बिल माफीचा निर्णय झाला नाही तर आप कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने करतील. मात्र वीज बिल माफीचा निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडू.’’ असे सांगून ते म्हणाले ‘‘प्रस्थापीत पक्षांचा फोलपणा लक्षात आल्याने आम आदमी पक्षाकडे समाजा अपेक्षेने पाहत आहे. त्यामुळे पदवीधर मतसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला. पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ.अमोल पवार उमेदवार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर महापालिकेची निवडणूकही पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार आहे. नुकताच महापालिकेवर पक्षाने मोर्चा काढला होता. त्याना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. शासनाने अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा कायदा केला पण अद्याप अंमलबजावणी नाही. कायदा त्वरीत लागू करावा.’   यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, संतोष घाटगे, नीलेश रेळेकर, सूरज सुर्वे, नारायण पवार यांच्यास कार्यकर्ते उपस्थित होते.

ऑडिटरसाठी आंदोलन
महापालिकेने पाच वर्षाच्या कारभाराचे ऑडिट करण्यासाठी ऑडिटर नेमावा यासाठी आपने आंदोलन केले. ऑडिटर नेमण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती. ती दोन दिवसात संपणार आहे. त्यानंतर पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे संदीप देसाई यांनी सांगितले.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT